हिंदू धर्माच्या विरोधात 'कार्तिक-कियाराचा सत्यनारायण की कथा'? | Kartik Aaryan And Kiara Advani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan And Kiara Advani's Satyaprem Ki Katha

हिंदू धर्माच्या विरोधात 'कार्तिक-कियाराचा सत्यनारायण की कथा'?

मुंबई : कियारा अडवाणीच्या वाढदिवसाच्या प्रसंगी अभिनेता कार्तिक आर्यनने त्यांचा आगामी चित्रपट 'सत्यनारायण की कथा'चे (Satyanarayan Ki Katha) नाव बदलल्याची घोषणा केली. आता 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) असे नवीन नाव देण्यात आल्याचे आर्यनने स्पष्ट केले. इन्स्टाग्रामवर त्याने चित्रपटाचे पिक्चर शेअर केले असून त्यात तो लिहितो वाढदिवसाच्या शुभेच्छा कथा! तुझे सत्यप्रेम. #सत्यप्रेम की कथा. पिक्चरमध्ये कार्तिकने कियाराचे हात धरल्याचे दिसत आहे. त्याने त्यात पार्श्वसंगीतही पोस्टमध्ये टाकले आहे. (Kartik Aaryan Kiara Advani's Film Title Satyanarayan Ki Katha Changed Now Satyaprem Ki Katha)

हेही वाचा: Sanjay Raut : पैसे खाल्ले का नाही? आरोह वेलणकरचा संजय राऊतांना सवाल

चित्रपटाच्या 'सत्यनारायण की कथा' या नावावरुन वादंग सुरु झाला होता. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणीने (Kiara Advani) यापूर्वीही भूल भूलैया २ मध्ये (Bhool Bhulaiya 2) एकत्र दिसले आहेत. गेल्या वर्षी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करुन चित्रपटाचे नाव बदलणार असल्याचे जाहीर केले होते. कार्तिकने सुद्धा त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरुन प्रसिद्धपत्रक पुन्हा शेअर केले. त्यात म्हटले की चित्रपटाचे नाव बदलले जाणार असून त्यातून भावना दुखवले जाणार नाहीत.

हेही वाचा: Timepass 3 : 'टाईमपास'चा बाॅक्स ऑफिसवर कल्ला, दोन दिवसांत केली इतकी कमाई

चित्रपटाचे नाव सर्जनशील प्रक्रियेतून सहज सुचलेले आहे. भावना दुःखू नये यासाठी आम्ही सत्यनारायण की कथाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि क्रिटिव्ह टीमनेही या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आम्ही लवकरच आमच्या प्रेमकथा असलेल्या चित्रपटाचे नवीन नावाची घोषणा करु असे समीर विद्वांस यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. चित्रपटाची निर्मिती साजिद नादियावाला यांनी नमह पिक्चर्सबरोबर करत आहेत.

Web Title: Kartik Aaryan Kiara Advanis Film Title Satyanarayan Ki Katha Changed Now Satyaprem Ki Katha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..