Kartik Aaryan: कार्तिकचं एकाच शब्दात उत्तर, चाहते खूश; हृतिकच्या बहिणीला डेट करण्यावर स्पष्टच बोलला

हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मीना रोशनला कार्तिक आर्यन डेट करत असल्याची अफवा गेल्या दोन दिवसांत जोर धरुन होती.
kartik Aaryan on rumours dating hrithik rohsan cousin pashmina roshan
kartik Aaryan on rumours dating hrithik rohsan cousin pashmina roshanGoogle

Kartik Aaryan: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हृतिक रोशनची चुलत बहिण पश्मिना रोशनला डेट करतोय अशी चर्चा सध्या सुरू आहे. बोललं जात आहे की सारा अली खानशी ब्रेकअप झाल्यानंतर कार्तिक पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. सध्या तो पश्मीना रोशनला डेट करतोय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. या बातम्यांमध्ये किती सत्यता आहे आणि किती नाही हे येणारा काळ सांगेलच. पण चाहत्यांना कार्तिक आर्यननं सांगून टाकलंय की तो पश्मीना रोशनला डेट करत आहे की नाही.(kartik Aaryan on rumours dating hrithik rohsan cousin pashmina roshan)

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

kartik Aaryan on rumours dating hrithik rohsan cousin pashmina roshan
KBC14: 'मी हात जोडतो पण...', भावूक झालेल्या अमिताभचं केबीसीच्या मंचावरनं लोकांना आवाहन

कार्तिक आर्यनच्या चाहत्यांना तेव्हा झटका लागला जेव्हा पश्मीना रोशनसोबतच्या त्याच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या. चाहत्यानं कार्तिक आर्यनला टॅग करत एक ट्वीट केलं होतं. चाहत्यानं लिहिलं होतं की,'पश्मीना रोशनला कार्तिक आर्यन डेट करत आहे'. हे वाचून कार्तिकचे सगळेच इतर चाहते मात्र हैराण झाले. कार्तिक पुन्हा कोणासोबत रिलेशनशीपमध्ये गुंतेल असं मानायला त्याचे चाहते तयार होईनात. सारा अली खानं सोबत ब्रेकअप झाल्यानंतर कार्तिकचं नाव कोणासोबतच जोडलं गेलं नाही,त्यामुळे इतक्या दिवसांनी पश्मीना रोशनसोबत अचानक नाव जोडलं गेल्यानं सगळे हैराण झाले.

kartik Aaryan on rumours dating hrithik rohsan cousin pashmina roshan
Big Boss 16 मध्ये हे पहिल्यांदाच घडतंय, मराठमोळ्या शिव ठाकरेनं अखेर करुन दाखवलं..

चाहत्यांनी कार्तिकच्या पश्मीनासोबतच्या अफेअरविषयी ऐकल्यावर त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरु केला, सगळेच त्याला ही बातमी खरी आहे का असा सवाल करू लागले.त्यावर कार्तिकनं एकाच शब्दात 'नो' म्हणत उत्तर दिलं. पश्मीना रोशन सोबत त्याचं नाव उगाच जोडलं जात आहे असं तो म्हणाला. ते दोघं एकमेकांना डेट करत नाही असं देखील कार्तिकनं नमूद केलं.

kartik Aaryan on rumours dating hrithik rohsan cousin pashmina roshan
Brahmastra 2: ना रणवीर,ना हृतिक 'ब्रह्मास्त्र २' साठी करण जोहरच्या मनात भलताच अभिनेता, समोर आलं नाव

कार्तिक आर्यनच्या पश्मीना रोशनसोबत डेट करण्यावरील उत्तराचा स्क्रीनशॉट घेत चाहत्यानं ते सोशल मीडियावर शेअर केलं आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'कार्तिककडून कार्तिकी पौर्णिमेला मस्त गिफ्ट मिळालं आहे. आता आम्ही त्याचे चाहते खूप खूश झालो आहोत. कार्तिकने स्वतः स्पष्ट केलं आहे की त्याच्यात आणि पश्मीनामध्ये असं कोणतंच नातं नाही'.

कार्तिक आर्यनच्या एका जवळच्या सूत्राने देखील या अफवेविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. हृतिकच्या बहिणीसोबत कार्तिकचं अफेअर नाही असं सूत्राने सांगितलं आहे. कार्तिक सध्या त्याच्या करिअरवर फोकस करत आहे. सध्या त्याच्याकडे रिलेशनशीपसाठी वेळ नाही.

कार्तिकच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'फ्रेडी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्यानं एका डेन्टिस्टची व्यक्तिरेखा साकारली आहे. कार्तिकनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की या सिनेमातील त्याची व्यक्तिरेखा खूप गुंतागुंतीची आहे. या भूमिकेला साकारण्यासाठी त्याला नेहमीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल असंही तो म्हणाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com