कार्तिक आर्यन म्हणतोय, 'आज खुश तो बहुत होगे तुम' !

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कार्तिकचं 'ते' स्वप्न पूर्ण झालयं जे बॉलिवूडचा प्रत्येक कलाकार बघतो. 

मुंबई :  'सोनू के टिट्टू की स्विटी' या चित्रपटामधून कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली. अभिनयाच्या उत्तम कामगिरीसह प्रेक्षकांची मने त्याने जिंकली. त्यानंतर तो आता मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने 'लव आज कल' च्या सिक्वेलचं शुटिंग पूर्ण केलं आणि आता तो 'पति पत्नी और वो' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतचं त्याचं असं एक स्वप्न पूर्ण झालयं जे बॉलिवूडचा प्रत्येक कलाकार बघतो. त्याविषयीची एक पोस्ट कार्तिकने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. 

 बॉलिवूड सुपरस्टार अभिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं त्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कारण, एका अॅडमध्ये तो बिग बींसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. एवढचं काय तर कार्तिकने अमिताभ यांच्यासोबतचा फॅन मुमेंट शेअर केला आहे. या व्हिीओमध्ये अमिताभ त्यांच्या एका जुन्या फोटोवर ऑटोग्राफ देत आहेत आणि त्यानंतर त्यांनी कार्तिकला एक मिठीदेखील मारली. 

हा क्षण कार्तिकसाठी किती खास आहे ते या व्हिडीओ आणि त्याच्या कॅप्शनमध्ये समजत आहे. कॅप्शन देताना त्याने लिहिलं,' आज खुश तो बहुत होगे तुम !! फॅन मुमेंट! खुद्द लेजेंडच्या बाजुला उभं राहून त्यांना माझ्यासाठी ऑटोग्राफ देताना पाहणं. तुमच्यासोबत शुटिंग करताना मजा आली सर पण, ये दिल मांगे मोअर. लव यू सर.'

कार्तिकने शुटिंग पूर्ण झाल्यावरही बिग बींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. 'बकेट लिस्ट' असं कॅप्शन देत त्याने कॅव्डिड फोटो इन्स्टाग्रामच्या अपलोड केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Bucket list @amitabhbachchan Sir

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kartik Aaryan shares a video crosses off a wish from bucket list