Katrina Kaif reveals that she never watch ghost movies before sleeping
Katrina Kaif reveals that she never watch ghost movies before sleepingInstagram

Katrina Kaif: झोपण्याआधी कतरिना चुकूनही करत नाही 'ही' चूक, मनातल्या भीतीविषयी स्पष्टच बोलली...

'फोन भूत' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कतरिना कैफनं आपल्या वैयक्तिक आयु्ष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Published on

katrina Kaif: कतरिना कैफ सध्या तिच्या 'फोन भूत' सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. सिनेमात तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील आहेत. सिनेमा हॉरर कॉमेडी धाटणीचा असणार आहे. रिपोर्ट्नुसार कळत आहे की कतरिना भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या तर अशा देखील उठल्या आहेत की,कतरिनाचा सिनेमात डबल रोल पहायला मिळणार आहे. यावर स्वतः कतरिना म्हणाली,''मी सिनेमात डबल रोल साकारतेय हे मी नाकारू शकत नाही. कारण माझ्या भूमिकेची दुसरी बाजू देखील सिनेमात दिसणार आहे''. त्यानंतर तिनं स्वतःविषयी देखील इंट्रेस्टिंग खुलासा केला आहे.(Katrina Kaif reveals that she never watch ghost movies before sleeping)

Katrina Kaif reveals that she never watch ghost movies before sleeping
Vaishali Takkar Suicide Case: अखेर पोलिसांच्या तावडीत वैशालीचा आरोपी, असा रचला होता सापळा...

कतरिना कैफ खूप कालावधीनंतर 'फोन भूत' या सिनेमाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या भेटीस येत आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिनं स्वतःच्या एका भीतीविषयी बोलून दाखवलं आहे. ती म्हणाली,''रात्री जर तिनं काही भीतीदायक असं पाहिलं तर ती झोपू शकत नाही. तिला वाईट स्वप्न येतात. एक काळ होता जेव्हा आपण रात्री घरातील सर्व दीवे आणि टी.व्ही देखील मोठ्या आवाजात चालू ठेवून झोपायचो'', असा खुलासा कतरिनानं केला आहे. आपण नेहमीच हॅप्पीवाले सिनेमे पाहतो असं देखील तिनं नमूद केलं.

Katrina Kaif reveals that she never watch ghost movies before sleeping
TV News: अनेक वर्षांनी टी.व्ही वर पुन्हा राम आणि सीता, अरुण गोविल-दीपिका चिखलियाची रंगली चर्चा

सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कतरिनानं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील देखील अनेक खुलासे केले आहेत. काही दिवसांपू्र्वीच तिनं म्हटलं होतं की, तिनं विकी कौशलला पहिल्यांदा 'मनमर्जियां' सिनेमाच्या प्रोमोत पाहिलं होतं. तेव्हा तिच्या मनात पटकनं आलं होतं की किती टॅलेंटेड मुलगा आहे. पुढे जाईल करिअरमध्ये.

कतरिनाच्या सिनेमांविषयी बोलायचं तर तिला शेवटचं 'सुर्यवंशी' सिनेमात पाहिलं होतं. तिच्या आगामी सिनेमांमध्ये 'फोनभूत' आणि त्यानंतर सलमानसोबत 'टायगर ३' मध्ये देखील ती दिसणार आहे. या सिनेमात इम्नान हाश्मि देखील आहे. त्यानंतर कतरिना विजय सेतुपतिसोबत 'मेरी ख्रिसमस' सिनेमातही काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com