
Video Viral: पहाटेच्या अंधारात विकी-कतरिनाची लपाछपी
'व्हॅलेंटाईन डे'(Valentine day) च्या प्रहरी कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky Kaushal) हे न्युली मॅरीड कपल्स मुंबई विमानतळावर(Mumbai AIrport) एकत्र दिसले. हे लव्हबर्ड्स हातात हात पकडून लोकांच्या नजरेपासून स्वतःला लपवत पहाटेच्या काळोखातून भरभर पावलं टाकत गाडीच्या दिशेने जात होते. 'पर उफ...ये जालिम दुनिया...', अखेर त्यांना मीडियाच्या कॅमेऱ्याने अचूक टीपलं. दोघांनी एकसाऱखाच पेहराव केलेला दिसत होता हे विशेष. आता व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मुंबईत ते आले आहेत म्हणजे अर्थातच त्यांच्या व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठीच असणार नाही का. असं बोललं जात आहे की ते थेट लंडनमधून इथे प्रवास करुन आले आहेत.
हेही वाचा: Video: भाऊ कदमचं असं काय चुकलं की निलेश साबळेनं त्याची थेट शाळाच घेतली
या प्रवासासाठी त्या दोघांनी निवडलेला कॉशच्युम एकदम परफेक्ट त्यांना शोभून दिसत होता. डेनिम आऊटफीट्स त्यांनी घातले होते. विकीनं व्हाइट टीशर्ट वर डेनिम जॅकेट,डेनिम जीन्स घातली होती तर कतरिनाही संपू्र्ण डेनिम लूकमध्ये एकदम रॉकिंग दिसत होती. एवढ्या पहाटे ते दोघे विमानतळावर उतरले तरी चाहत्यांच्या गर्दीनं त्यांना विमानतळाबाहेर गाठलंच. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा नुसता पाऊल पडलेला दिसत आहे. कुणी या दोघांच्या साधेपणावर लट्टू झालं आहे तर कुणी कतरिनानं ज्या प्रेमाने विकीचा हात पकडला आहे ते पाहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कुणी म्हटलंय,'दोघांना सकाळी सकाळी पाहिल्यावर खूप मस्त वाटलं,दिल खूश हो गया'. तर कुणी म्हटलं,'बॉलीवूडचं रॉयल कपल'. काहींनी वाईट नजरांपासून दोघांना वाचवण्यासाठीचे इमोजी देखील शेअर केले आहेत.
गेल्या वर्षी ९ डिसेंबरला कतरिना आणि विकीनं लग्नगाठ बांधली होती. राजस्थानमध्ये रॉयल अंदाजात त्यांचं लग्न पार पडलं. हनिमूनसाठी या दोघांनी मालदीवची निलड केली होती. कतरिनाने मालदीवमधील फोटो पोस्ट केल्यावर चाहते त्यावर भाळले होते. या दोघांनी त्यांची पहिली लोऱ्ही देखील पारंपरिक रित्या कुटुंबासोबत साजरी केली होती. त्यानंतर विकी इंदूरमध्ये त्यांच्या शुटिंगच्या निमित्तानं बिझी होता. पण कतरिनाचे त्यानिमित्तानं इंदूर दौरे वाढलेले पहायला मिळाले. आता व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठी ते दोघे पुन्हा आपल्या कामातून ब्रेक घेत मुंबईत परतले आहेत. आता चाहत्यांचं लक्ष आहे ते त्यांच्या व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनच्या रोमॅंटिक पोस्टकडे.
Web Title: Katrina Kaif Vicky Kaushal Returned To Mumbai Early Morning On Valentine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..