बिहारचा सनोज राज ठरला यंदाचा पहिला करोडपती

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

सनोजचे विचार आणि विचारसारणीने बच्चन प्रभावित झाले होते. त्यांनी त्याचे कौतुक
करत म्हटले की, आपल्या देशाचे भविष्य घडवण्यासाठी आपल्याला अशाच दृढ निश्चयी आणि ज्ञानी माणसांची आवश्यकता आहे.

मुंबई : कौन बनेगा करोडपतीच्या 11 व्या सत्रात सनोज राज हा बिहारहून आलेला स्पर्धक पहिला करोडपती ठरला आहे. 

सरळसाध्या आणि मृदुभाषी सनोजने अत्यंत धिराने आणि निर्धाराने एकामागून एक प्रश्नांची उत्तरे देत हॉट सीटचा लढा जिंकला. आयएएससाठी प्रयत्न करत असलेला सनोज सध्या दिल्लीत राहतो व यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. त्याचा विश्वास आहे की, IAS मुळे जे पद मिळते, त्यात सत्ता असते, जी बदल घडवून आणू शकते. धोरण तयार करणे व त्याचे पालन या विषयात त्याला रुची आहे. आरोग्य आणि पर्यावरण विषयक धोरणे बनवण्याची त्याची इच्छा आहे. त्याच्या मते, गावांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग, योग्य ड्रेनेज व्यवस्था आणि वृक्षारोपण याबाबत कडक धोरणांची आवश्यकता आहे. आरोग्याच्या बाबतीत त्याला कुपोषण आणि सेंद्रिय व नैसर्गिक शेती यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज वाटते.

सनोजचे विचार आणि विचारसारणीने बच्चन प्रभावित झाले होते. त्यांनी त्याचे कौतुक
करत म्हटले की, आपल्या देशाचे भविष्य घडवण्यासाठी आपल्याला अशाच दृढ निश्चयी आणि ज्ञानी माणसांची आवश्यकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kaun Banega Crorepati 11 Sanoj Raj Becomes This Seasons First Crorepati