Kaushal Inamdar Post : ‘भारताचा यहुदी मेन्युहिन', आजोबांसाठी संगीतकार कौशल इनामदार यांची खास पोस्ट!

मराठी संगीतविश्वामध्ये आपल्या संगीतानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संगीतकारांमध्ये कौशल इनामदार यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
Kaushal Inamdar Marathi Singer Musician
Kaushal Inamdar Marathi Singer Musicianesakal

Kaushal Inamdar Marathi Singer Musician : मराठी संगीतविश्वामध्ये आपल्या संगीतानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संगीतकारांमध्ये कौशल इनामदार यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सध्या त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात त्यांनी त्यांचे आजोबा प्रख्यात व्हायोलिन वादक शंकर बिनिवाले यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कौशल यांनी फेसबूकवर जी पोस्ट शेयर केली आहे त्यातून त्यांनी चाहते, वाचक यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी दिवाळीचे निमित्ता साधत आजोबांविषयी केलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे. मराठीतला पहिला बोलपट त्यातील आजोबांचा सहभाग याशिवाय त्यांचा साता समुद्रापारचा प्रवास याविषयी देखील त्यांनी उल्लेख केला आहे.

आज अनेक वर्षांनंतर धनत्रयोदशी ही १० नोव्हेंबरला आली आहे. १९०९ सालीही धनत्रयोदशी १० नोव्हेंबरला आली होती. त्या दिवशी पुण्याच्या सरदार बिनिवाल्यांच्या घरात एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव शंकर ठेवलं गेलं. १९३२ साली, म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ या मराठीतल्या पहिल्या बोलपटात गोविंदराव टेंब्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली व्हायोलिन वाजवलं.

Kaushal Inamdar Marathi Singer Musician
Rashmika Viral Video : रश्मिकाचा 'तो' व्हिडिओ, अमिताभ बच्चन यांचा संताप! 'कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी', नेमकं घडलं काय?

१९३३ साली वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षीच ‘जिथून हे वाद्य आलं आहे तिथे जाऊन मी शिकायला हवं’ असं त्यांच्या मनात येऊन ते इंग्लंडला जाणाऱ्या एका जहाजात बसले पण नियतीने त्यांना इटलीला नेलं! शंकरराव बिनिवाले, आमच्यासाठी आप्पासाहेब, हे माझे आजोबा. आईचे वडील. आज त्यांची ११४वी जयंती.

आता त्यांची जी छायाचित्र दिली आहेत त्यातल्या एका फोटोत एका डच वर्तमानपत्राने त्यांचा उल्लेख ‘भारताचा यहुदी मेन्युहिन’ असा केला आहे! ते आणि त्यांच्या ५ जर्मन व्हायोलिन्ससहित जो फोटो आहे तो सुप्रसिद्ध लेखिका- दिग्दर्शिका सई परांजपे यांनी काढला आहे.

आप्पासाहेब अबोल आणि मितभाषी होते पण आम्हा नातवंडांना गोष्टी सांगणं त्यांना आवडायचं. सिंदबादच्या सात सफरींची गोष्ट रंगवून सांगणारे आप्पासाहेब स्वतःच एक सिंदबाद होते. त्यांच्या अद्भुत सफरीची ही कहाणी - लिंक कमेन्ट्समध्ये देतोय. नक्की ऐका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com