esakal | KBC 13: सात कोटी रुपयांच्या 'जॅकपॉट' प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का?
sakal

बोलून बातमी शोधा

KBC 13: सात कोटी रुपयांच्या 'जॅकपॉट' प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का?

KBC 13: सात कोटी रुपयांच्या 'जॅकपॉट' प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कौन बनेगा करोडपतीच्या १३व्या KBC 13 सिझनमध्ये आग्र्याच्या हिमानी बुंदेला Himani Bundela या पहिल्या कोट्यधीश ठरल्या. २५ वर्षीय हिमानी या दृष्टीहीन आहेत. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर त्यांना सात कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्याच्या उत्तराबद्दल हिमानी साशंक असल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. हिमानी यांच्या एक कोटी रुपयांपर्यंतच्या प्रवासाचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

हिमानी यांना विचारण्यात आलेला १ कोटी रुपयांचा प्रश्न

खेळ सुरु करण्यापूर्वी हिमानी यांनी त्यांनी लिहिलेल्या काही ओळी म्हणून दाखवल्या. एक कोटी रुपये जिंकण्यासाठी त्यांनी पंधराव्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित होतं. हा प्रश्न ब्रिटीश गुप्तहेर इनायत खानविषयी होता. बऱ्याच विचारानंतर त्यांनी शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांना उत्तर लॉक करण्यास सांगितलं आणि ते उत्तर बरोबर होतं. पंधराव्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत हिमानी या सिझनच्या पहिल्या करोडपती ठरल्या.

काय होता प्रश्न?

दुसऱ्या महायुद्धात फ्रान्समध्ये ब्रिटनसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी नूर इनायत खान यांनी कोणतं खोटं नाव वापरलं होतं?

चार पर्याय- वेरा अटकिन्स, क्रिस्टीना स्कारबेक, ज्युलिएन आयस्नेर आणि जीन-मेरी रेनियर

अचूक उत्तर- जीन-मेरी रेनियर

हेही वाचा: KBC 13: जिंकलेल्या रकमेचं काय करणार? कोट्यधीश हिमानीचं उत्तर

एक कोटी रुपयांसोबतच हिमानी यांना ह्युंदाई ऑरा कारसुद्धा भेट म्हणून देण्यात आली. हिमानी यांच्यासमोर ७ कोटी रुपयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा जॅकपॉट प्रश्न होता. प्रश्न ऐकल्यानंतर उत्तराबाबत त्या थोड्या संभ्रमात दिसल्या. अचूक उत्तर माहित नसल्याने त्यांनी शो सोडण्याचा विचार केला.

काय होता प्रश्न?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचे शीर्षक काय होते? ज्यासाठी त्यांना 1923 मध्ये डॉक्टरेट प्रदान करण्यात आली होती.

चार पर्याय- द वाँट अँड मीन्स ऑफ इंडिया, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया आणि द लॉ अँड लॉयर्स

अचूक उत्तर- द प्रॉब्लेम ऑफ द रुपी

खेळ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिग बींनी हिमानी यांना एक पर्याय निवडण्यास सांगितलं होतं. त्यावर त्यांनी डिव्हिडंट ऑफ इंडिया हा पर्याय निवडला होता. हे उत्तर चूक होतं, त्यामुळे शो सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचा दिलासा त्यांना मिळाला.

loading image
go to top