esakal | ''नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का?''

बोलून बातमी शोधा

Kedar shinde posted story o
''नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का?''
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - देशात सध्या कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलिसविना कारण घराबाहेर पडणऱ्यांवर कारवाई करत आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन सरकार नागरिकांना करत आहे. पण नेत्यांच्या आसपास होणाऱ्या गर्दीवरुन प्रसिध्द मराठी चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदेने टीका केली आहे.

केदार सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. देशातील सुरू असलेल्या घडामोडींवर तो सोशल मीडियावर भाष्य करतो. केदारने नुकतीच एक इन्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने लिहीले,’टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते,त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!’ , केदारच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अनेक नेटकऱ्यांनी केदारच्या पोस्टला समर्थन दिले आहे. यापूर्वीही त्याने देशातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे.

img

kedar shinde post

या स्टोरीमध्ये तो म्हणतो, ‘भविष्यात वीज/गॅस प्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको, स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वाससुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष….’ केदारच्या सध्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

अगं बाई अरेच्चा, जत्रा, य़ंदा कर्तव्य आहे, खो खो, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा 2, माझा नवरा तुझी बायको, यांचा काही नेम नाही या प्रसिध्द मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केदारने केले आहे.