Kedar Shinde: एक गोष्ट ध्यानात ठेव! केदार शिंदेंची लेक सनासाठी खास पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kedar shinde shared post about his daughter sana shinde on her birthday

Kedar Shinde: एक गोष्ट ध्यानात ठेव! केदार शिंदेंची लेक सनासाठी खास पोस्ट

kedar shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट, प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. त्यांच्या या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पत्नीची म्हणजेच भानुमती कृष्णराव साबळे यांची भूमिका साकरणार आहे. या भूमिकेतून ती प्रथमच चित्रपटात पदार्पण करत आहे. त्यामुळे केदार शिंदे आणि सनासाठी ही खास बाब आहे. विशेष म्हणजे आज सनाचा वाढदिवस. त्या निमित्ताने केदार शिंदे यांनी आपल्या लेकीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

(kedar shinde shared post about his daughter sana shinde on her birthday)

लेकीसाठी केदार शिंदे म्हणतात, 'प्रिय सना... तशी रोजच भेटतेस.. पण आज हे लिहिण्याचं कारण, तुझा वाढदिवस.. दरवर्षी प्रमाणे आजही तो आलाच!!! पण दरवर्षी पेक्षा यंदा त्याचं महत्व तुला जास्त वाटत असावं. कारण या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी तू कॅमेऱ्यासमोर काम करते आहेस.. हे येणारं वर्ष तुझ्यासाठी खुप आव्हानात्मक असणार आहे.'

हेही वाचा: Man Kasturi Re: 'मन कस्तुरी रे' चित्रपटाबाबत त्या रात्री नेमक काय झालं? बघाच..

पुढे ते म्हणतात, 'कॅमेऱ्यासमोर येण्याचं तुझं तू ठरवलस.. त्याआधी गेले काही वर्ष मला सहाय्यक म्हणून मदत केलीस.. माझ्या शिव्या ओरडा हक्काने खाललास.. खुप वेळा डोळ्यात पाणी सुध्दा आलं असेल. पण तू, हू का चू केलं नाहीस. माझ्या टीममध्ये तुला राजकुमारीची ट्रिटमेंट कधीच मिळू नये याकडे माझं लक्ष होतं. कारण, त्याशिवाय मिळणाऱ्या गोष्टीची तुला किंमत कधीच कळणार नाही.. आता महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तू माझ्या आजीची म्हणजे, भानुमती साबळे ही भुमिका करते आहेस. त्यासाठी तुझ्या इतकाच मी सुद्धा excited आहे. प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक कामावर भरभरून प्रेम केलं. तेच तुझ्याही वाट्याला येवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..'

'सना.. कलाकाराचं आयुष्य हे ECG सारखं असतं. वर खाली आलेख आपल्याला अस्वस्थ करतो. कधी आनंद तर कधी दु:ख देतो... मायबाप प्रेक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं तर आपले पाय आपसूकच जमिनीवर रहातात एवढं ध्यानात ठेव!!!!! .. तुझाच बाबा' अशी भावनिक पण लेकीला पाठिंबा अआणि शहाणपण देणारी ही पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :kedar shinde