Kedar Shinde: केदार शिंदे राजकारणात येणार, या नेत्याला देणार पाठींबा, केला मोठा खुलासा

केदार यांनी एका मुलाखतीत ते राजकारणात येणार असल्याचा खुलासा केलाय.
kedar shinde wants to support raj thackeray when he enter in maharashtra politics baipan bhaari deva
kedar shinde wants to support raj thackeray when he enter in maharashtra politics baipan bhaari devaSAKAL

Kedar Shinde News: अभिनेते - निर्माते - दिग्दर्शक केदार शिंदेंनी आजवर मराठी मनोरंजन विश्वाला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. केदार शिंदे यांनी नुकतंच मराठी मनोरंजन विश्वात बाईपण भारी देवा हा सुपरहिट सिनेमा दिला.

केदार शिंदे यांनी या वर्षी २०२३ ला महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा असे दोन वेगळ्या धाटणीचे सुंदर सिनेमे दिले. अशातच केदार यांनी एका मुलाखतीत ते राजकारणात येणार असल्याचा खुलासा केलाय.

(kedar shinde enter in politics)

kedar shinde wants to support raj thackeray when he enter in maharashtra politics baipan bhaari deva
Oppenheimer Nitish Bharadwaj: भगवद्गीता आणि 'त्या' दृश्याचं नितीश भारद्वाज यांनी केलं समर्थन, म्हणाले...

केदार शिंदे राजकारणात येणार

केदार शिंदे यांनी मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते राजकारणात येणार आणि कोणत्या पक्षाला आणि नेत्याला सपोर्ट करणार याचा खुलासा केलाय.

केदार शिंदेंनी जी मुलाखत दिली त्यानुसार, केदार शिंदेंना राजकारणात जायचं आहे. सध्याच्या राजकारणावर भाष्य करण्याची त्यांची इच्छा नाही. पण केदार यांना मैदानात येऊन लढायचं आहे. त्यांना ही योग्य वेळ वाटते.

केदार शिंदे या नेत्याला करणार सपोर्ट

केदार शिंदेंनी खुलासा केला की, जेव्हा मी स्वतः राजकारणात उतरेल तेव्हा मला काही बोलण्याचा अधिकार असेल. मनोरंजन विश्वातुन आर्थिक स्थैर्य मिळालं की, केदार राजकारणात जाण्याचा विचार करतील.

केदार शिंदेंच्या पडत्या काळात राज ठाकरेंनी त्यांना साथ दिली याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणात आल्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंना सपोर्ट करण्याची केदार यांना इच्छा आहे. याशिवाय केवळ उदरनिर्वाहासाठी राजकारण न करता मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी काहीतरी करण्याचा केदार शिंदेंचा विचार आहे.

केदार शिंदेंनी मानले प्रेक्षकांचे आभार

बाईपण भारी देवा सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. हा रिपोर्ट पाहून बाईपण भारी देवा सैराटचा विक्रम मोडणार अशी चिन्हं दिसत आहेत. बाईपण भारी देवा सिनेमाने आतापर्यंत ६५.६१ कोटींची कमाई केलीय.

या कमाईबद्दल बाईपण भारी देवाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी भावना व्यक्त केल्या. केदार शिंदे म्हणतात.. ही तर श्री स्वामींची कृपा.. हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद.. मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. सैराट नंतरचा बाईपण ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com