National Film Awards : किर्ती सुरेश ठरली 'महानटी'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश हिला महानटी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : नवी दिल्लीत 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात भोंगा या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून अंधाधूनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश हिला महानटी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

‘उरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला असून गतवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. 

दरम्यान, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ या मराठी चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ’ याच चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या (चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keerthy Suresh bags Best Actress award for her portrayal of Savitri