Ketaki Mategaonkar: अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत मुलीच्या शरीरावर... ट्रोलर्सच्या कमेंट्सवर केतकीचं सणसणीत उत्तर

केतकीची पोस्ट होतेय व्हायरल
Ketaki Mategaonkar
Ketaki Mategaonkar Esakal

Ketaki Mategaonkar: अख्या महाराष्ट्राला प्रेमाचे वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. केतकीनं 'टाईमपास' मधून मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. नुकताच केतकीचा 'अंकुश' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही, मात्र केतकीच्या अभिनयाने पुन्हा सर्वांची मन जिंकली.

केतकी सोशल मिडियावर देखील खुप सक्रिय असते. आता केतकीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात तिने टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मिडियावर अनेकदा कलाकारांना कपड्यावरुन, शरिरावरुन आणि देहबोलीवरुन ट्रोल केलं जात. अशाच लोकांसाठी केतकीची ही खास पोस्ट आहे.

या पोस्टमध्ये केतकी लिहिते, प्रिय लोक ज्यांना कधीकधी माझ्यासारखा body shaming लज्जास्पदपणाचा सामना करावा लागतो,

किती बारीक आहेस गं, अजून लहान मुलीचे कपडे घालतेस ? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारीक होतात, आता पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असो, ऑफिस मधले सहकर्मचारी असो कोणीही असो! आपल्याला नेहमी ह्या अशा वाक्यांना सामोरं जाव लागतं. हो, मी यात तुमच्यासोबत आहे. मी पूर्णपणे तुमच्यासोबत आहे.

Ketaki Mategaonkar
Urfi Javed: उर्फी जावेदला मोठा झटका! इंस्टाग्रामने अकाउंट केलं सस्पेंड

पण, तुमच्या शरीराचा अभिमान बाळगा. आपण सुंदर आणि अद्वितीय आहोत! त्या वेगळेपणाला महत्त्व द्या. ते देवाने दिलेले आहे.

जर एखादा डॉक्टर, आहारतज्ञ किंवा पात्रता असलेले कोणी किंवा तुमचे आई वडिल मित्र ज्यांना तुमची मनापासून काळजी असेल, त्यांचे ऐका! अशा व्यक्तींचे नाही जी तुम्हाला खाली खेचतात आणि तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटू देतात.

प्रिय ट्रोलर्स,

शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, SKINNY, (हाडांचा सापळा) बारिक आहे, हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील माझे आजोबा सगळे बारीक तशी मी सुद्धा आहे बारीक !

तरीही अजिबात न थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं. थोडं वजन वाढवायला हवं का ? तर हो असेल ! पण म्हणून unhealthy आहे का ? तर अजिबात नाही !

Ketaki Mategaonkar
Randeep-Lin Wedding Video: लक्ष्मी नारायणाचा जोडा! लग्नाच्या पाच दिवसानंतर रणदीप अन् लिनने शेअर केला लग्नाचा व्हिडिओ..

व्यायाम किंवा gym फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीके.

पुढे केतकी लिहिते, पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत comment करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या body parts वर openly comment करणं. ह्याला तुम्ही "स्वातंत्र्य " आणि Free Speech असं नाव देता.

आम्ही ट्रोलिंगपासून मुक्त झालो असलो तरी, 100 आणि 1000 सुंदर लोकांच्या तुलनेत तुमची संख्या खूपच कमी आहे. जे आम्हाला पाठिंबा देतात आणि प्रेरित करतात.

आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत. We cut and we bleed just like others. We do get hurt too.

तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल. त्याचा विचार करा. आणि काही लोकं असेही असतील ज्यांना खरंच medical problem असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल, कल्पना करा की तुम्ही त्यांना कोणत्या भयंकर मानसिक अवस्थेत टाकत आहात!

Ketaki Mategaonkar
Koffee with Karan 8: क्रिती सेननबद्दल पसरवल्या जाताय खोट्या बातम्या! अभिनेत्रीनं घेतली कायदेशीर मदत...

थोडे दयाळू आणि प्रेमळ व्हा. थोडी सहानुभूती बाळगा! माझ्या सर्व प्रिय आणि सर्वात मौल्यवान चाहत्यांसाठी तुमच्या सततच्या प्रेमासाठी, पाठिंब्याबद्दल, निष्ठेबद्दल खूप खूप धन्यवाद. मी जशी आहे तशीच मला स्वीकारल्याबद्दल. तुम्ही मला समजतात. तुमचे सकारात्मक संदेश आहेत. जे मला प्रेरित करतात.

सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा असे काहीतरी घडते, तुम्ही पहिले असतात जे मला तुमच्या संदेश आणि पोस्ट्सद्वारे मला हसवतात.

मी तुमच्या dms आणि मेसेजच्या कमेंट वाचते आणि तुम्ही मला दाखवलेल्या समर्थनामुळे मी अगदी भारावून गेले आहे.

मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय! आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन!

सध्या केतकीची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्यावर अनेक प्रतिक्रिया देत असून तिने यावर भाष्य केल्यामुळे तिचे कौतुकही करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com