दाजींनीच केजीएफच्या दिग्दर्शकाचा नाकारला पहिला चित्रपट, कारण...|KGF 2 Director Prashant Nil happy birthday | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KGF 2 Director Prashant Nil happy birthday

दाजींनीच केजीएफच्या दिग्दर्शकाचा नाकारला पहिला चित्रपट, कारण...

KGF 2 Movie: केजीएफच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांना केजीएफच्या दुसऱ्या भागाचा आनंद घेता आला. रॉकी भाईचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना (tollywood movie) कमालीचा भावला. अजुनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करताना दिसतो आहे. प्रशांत नील यांनी(entertainment news) केजीएफच्या दोन्ही पार्टचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटानंतर ते प्रकाशझोतात आहे. त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली. मात्र हा चित्रपट होण्यापूर्वीच्या प्रशांत नील यांची (Prashant Nil) स्टोरी काहीशी वेगळी आहे. तेवढीच ती प्रेरणादायी देखील आहे. प्रशांत यांनी केजीएफ 2 प्रदर्शित झाल्यानंतर दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतीतून आपण फक्त पैशांसाठीच या क्षेत्रामध्ये आल्याचे सांगत आपल्या पहिल्या चित्रपटाचा अनुभव शेयर केला होता.

कन्नड चित्रपट दिग्दर्शक प्रशांत नील यांचा रुबाब केजीएफ पासून वाढला. ते लाईमलाईटमध्ये आले. केजीएफमुळे त्यांची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यात गेली. आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. केवळ आठ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी मोठी मजल मारली आहे. ज्या दिग्दर्शकांनी तीस ते चाळीस वर्षे या क्षेत्रामध्ये काम करुनही त्यांना जेवढी लोकप्रियता मिळाली नाही तेवढी प्रशांत नील यांना केजीएफनं दिली असे म्हणता येईल. केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. प्रशांत नील यांच्याबाबत एक महत्वाची बाब सांगायची झाल्यास ते अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांची कोणतीही फिल्म फ्लॉप झालेली नाही.

केजीएफच्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यातून त्यांची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर आली होती. आपल्याला केवळ पैसे कमवण्यासाठी फिल्म लाईनमध्ये यायचे होते. आणि आपण आपल्या दोन्ही चित्रपटातून ते कमावले असे प्रशांत मोठ्या अभिमानानं सांगतात. मी जे काम करतो ते पूर्ण प्रामाणिकपणे, आपण काहीही झालं तरी प्रेक्षकांना नाराज करायचे नाही अशी माझी प्रामाणिक भावना आहे. त्यानुसार मी काम करतो. मी जेव्हा एक फिल्म कोर्स केला त्यानंतर एक स्क्रिप्ट लिहिली होती. त्यात माझ्या दाजींना सहभागी करुन घ्यायचे होते. ते त्यात अभिनय करणार होते. मात्र माझ्या कथेत त्यांना कमतरता दिसून आली. त्यांनी मला नकार दिला. श्रीमुरली यांनी मला आणखी काय करावे लागेल, कोणत्या गोष्टींवर विशेष काम करावे लागेल याविषयी मार्गदर्शन केले. असेही प्रशांत नील यांनी यावेळी सांगितले.