
यशनं आपल्या अभिनयानं साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक खास जागा तयार केली आहे.
मुंबई - केजीएफ चा दुसरा भाग कधी येणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. त्याच्या पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद पाहता दुसरा भागही कमालीचा लोकप्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात प्रमुख भूमिका करणा-या यशचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो आपल्या लहान मुलाबरोबर खेळत आहे. सोशल मीडियावर यशनं हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. यशनं केजीएफमध्ये रॉकीची भूमिका साकारली होती. ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. केवळ टॉलीवूडमध्येच नाहीतर बॉलीवूडमध्येही त्याच्या नावाची चर्चा आहे.
यशनं आपल्या अभिनयानं साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक खास जागा तयार केली आहे. एक यशस्वी अभिनेता म्हणूनही त्याची ओळख आहे. येत्या काही महिन्यात त्याचा केजीएफ 2 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा मुलासोबत खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो आपल्या मुलासोबत मस्ती करत आहे. यशचा मुलगा यशच्या गालावर मारत आहे. त्यानंतर तो हसतो आहे असे त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. बाप लेकाचा तो क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर हिट झाला आहे. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्या दोघांचे कौतूकही केले आहे.
केजीएफचा स्टार यश ने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर एक कॅप्शन दिले आहे. त्यात तो लिहितो अप्पायेन. त्या व्हिडिओला तब्बल 13 लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. एवढा त्या बापलेकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यशनं 2008 मध्ये कन्नड चित्रपट मोगिना मनसु पासून अभिनयाला सुरुवात केली. त्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याचे अॅवॉर्डही मिळाले होते.
मोदालासाला ही त्याची सर्वात पहिली हिट फिल्म होती. त्यानंतर त्यानं 2016 मध्ये अभिनेत्री राधिकाशी लग्न केले होते. राधिकाही साऊथची आघा़डीची अभिनेत्री आहे. यशच्या केजीएफ च्या दुस-या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात संजय दत्त, रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.