esakal | रॉकीच्या वाढदिवसाला ‘KGF चॅप्टर -2’ चा टीझरची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

kgf fame actor yash birthday kgf 2 teaser release on social media

साऊथच्या सध्याच्या चित्रपटांमधील सर्वाधिक बोलबाला असलेला चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर – 1’.  त्याला प्रचंड यश मिळाले. तितकीच त्याच्या वाट्याला प्रसिध्दीही मिळाली.

रॉकीच्या वाढदिवसाला ‘KGF चॅप्टर -2’ चा टीझरची भेट

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कमालीची लोकप्रियता लाभलेल्या केजीएफ या चित्रपटाच्या दुस-या भागाची प्रतिभा गेल्या दोन वर्षांपासून वाट पाहत आहेत. बाहुबली नंतर सर्वाधिक उत्सुकता असलेला चित्रपट म्हणजे केजीएफ 2. आता त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यालाही अल्पावधीत लाखो हिटस मिळाले आहेत. संजय दत्त, रवीना टंडनही यांची भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षीचा सर्वात लक्षवेधी चित्रपट मानला गेला आहे.

केजीएफच्या 2 भागात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता रॉकी अर्थात यश याच्या जन्मदिनी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र तसे काही झाले नाही. दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या वाढदिवसाची भेट म्हणून केजीएफ चॅप्टर 2 चा टीझर प्रदर्शित करणार असल्याची सगळीकडे चर्चाही होती.  परंतु सातत्यानं प्रेक्षकांची वाढत चाललेली मागणी, अपेक्षा यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रदर्शन आगाऊ एक दिवस करण्यात आले.  होमबेल फिल्म्सच्या युट्यूब चॅनेलवर ७ जानेवारी २०२१ ला रात्री 9.29 वाजता हा टीझर प्रदर्शित झाला. संजय दत्तची झलक या टीझरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

साऊथच्या सध्याच्या चित्रपटांमधील सर्वाधिक बोलबाला असलेला चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर – 1’.  त्याला प्रचंड यश मिळाले. तितकीच त्याच्या वाट्याला प्रसिध्दीही मिळाली. तो भाग झाल्यानंतर आता दुसरा भाग कधी येणार असा प्रश्न चाहते विचारु लागले होते. दोन वर्षांपासून केवळ प्रदर्शनाच्या तारखा निर्मात्यांकडून सांगण्यात आल्या. प्रत्यक्षात चित्रिकरण, नवीन पात्रे, संकलन, डबिंग यामुळे घोडे अडल्याचे सांगितले जात होते. चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसाठी खास सरप्राइज दिलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘केजीएफ चॅप्टर 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

हॅप्पी बर्थ डे यश: बसचालक होते 'या' अभिनेत्याचे वडिल, रॉकिंग स्टार यशच्या नावाने बनवली ओळख  

केजीएफ चॅप्टर 1’ हा चित्रपट जिथं संपला. तिथून पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होते. यात संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आता सोशल मीडियावर जो टीझर प्रसिध्द झाला आहे त्यात रॉकीची आई आणि त्याचं बालपण दाखवण्यात आलं आहे. त्याच्या आईने त्याला लहानाचं मोठं कसं केलं आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला. तसंच त्याने दिलेलं वचन आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे