Khalapur Landslide: अनुराधा पौडवाल इर्शाळवाडीतील पूरग्रस्त बांधवांना घर बांधुन देणार, महत्वाची मदत

अनुराधा पौडवाल यांनी खालापूर इर्शाळवाडी पूरग्रस्त बांधवांना घर बांधुन देणार आहेत.
Khalapur Landslide Anuradha Paudwal will build a house for flood affected peoples in Irshalwadi
Khalapur Landslide Anuradha Paudwal will build a house for flood affected peoples in IrshalwadiSAKAL

Khalapur Landslide Anuradha Puadwal News: गायिका अनुराधा पौडवाल यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. अनुराधा पौडवाल यांनी खालापूर इर्शाळवाडी पूरग्रस्त बांधवांना घर बांधुन देणार आहेत. अनुराधा पौडवाल यांनी इर्शाळवाडीसाठी घेतलेला हा मदतीचा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.

(Khalapur Landslide Anuradha Paudwal will build a house for flood affected peoples in Irshalwadi )

अनुराधा पौडवाल बांधुन देणार घर

अनुराधा पौडवाल या स्वतःहून इर्शाळवाडीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी यावेळी जाहीर केले की, 'माणुसकीच्या नात्याने सर्वांनी सढळ हाताने मदत करा. त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. जी काही थोडीफार मदत तुम्ही करू शकता ती करा. तुमचा मदतीचा हात तुम्ही पुढे करा.' असं आवाहन अनुराधा यांनी केलं आहे.

अनुराधा पौडवाल यांनी सरकारच्या पॉलिसीप्रमाणे जी काही मदत असेल ती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी घर बांधून देणार असल्याचे सांगितले आहे. अनुराधा यांच्या सर्वोदय फाउंडेशनमार्फत जी काही मदत करता येतील ती त्या करणार असल्याचे त्यांनी सांगीतलं आहे.

Khalapur Landslide Anuradha Paudwal will build a house for flood affected peoples in Irshalwadi
Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा मधील केतकीची मुलगी झाली ग्रॅज्युएट, आई झाली खुश

खालापूर दुर्घटना अपडेट

इर्शाळवाडीचा दुसरा दिवसही विषण्ण मनस्थितीत उगवला. ४० तासांच्या शोधकार्यानंतर काल सायंकाळपर्यंत सहा मृतदेह बचावपथकाच्या हाती लागले असून, मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११० नागरिकांची ओळख पटली आहे. अजूनही ७० ते ८० नागरिकांचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.  

Khalapur Landslide Anuradha Paudwal will build a house for flood affected peoples in Irshalwadi
Kushal Badrike: आता कृष्णाने अवतार घ्यावा... मणिपूर घटनेचा कुशल बद्रिकेकडून जाहीर निषेध

सिडको’मार्फत होणार इर्शाळवाडीचे पुनर्वसन

दुर्घटनाग्रस्त भागातील नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी ६० कंटेनर मागविण्यात आले आहेत. ‘सिडको’च्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘‘ स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंबे वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com