Khatron Ke Khiladi 12 : 'हे' स्पर्धक होणार बाहेर, वाईल्ड कार्डने पुन्हा एंट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khatron Ke Khiladi 12 News

Khatron Ke Khiladi 12 : 'हे' स्पर्धक होणार बाहेर, वाईल्ड कार्डने पुन्हा एंट्री

Khatron Ke Khiladi 12 News : 'खतरों के खिलाडी 12' मध्ये जसजसे आठवडे पुढे जात आहेत, तस-तसे स्पर्धकांमधील स्टंट्स अधिक रोचक होत आहेत. पुढच्या टप्प्यात जाण्याची संधी मिळावी यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला ट्रॉफी उचलताना पाहायचे आहे. आत्तापर्यंतच्या शोवर नजर टाकली तर, मोहित मलिक, तुषार कालिया, मिस्टर फैझू आणि रुबिना दिलैक (Rubina Dilaik) हे स्पर्धक मजबूत दिसत आहेत. दरम्यान, रविवारी एक धक्कादायक एव्हिक्शन होणार आहे, जे चाहत्यांना धक्का राहिल. (Khatron Ke Khiladi)

फैजू बाहेर होणार

सोशल मीडिया स्टार मिस्टर फैजूला या आठवड्यात रोहित शेट्टीच्या शोमधून बाहेर होतील. मात्र, तो पुन्हा वाईल्ड कार्डद्वारे परतेल. 'खतरों के खिलाडी 12' च्या फॅन पेज khatronkekhiladi.12.tazakhabar ने एक पोस्ट शेअर केली आहे की 'मिस्टर फैझूला एव्हिक्ट झाले आहे. पुढच्या आठवड्यात तो वाईल्ड कार्डने परत येईल. (Entertainment News)

फैजू शोच्या शेवटीच्या टप्प्यात

'खतरों के खिलाडी 12' मधील मिस्टर फैझू आणि जन्नत जुबेरची जोडी चाहत्यांची आवडती होती. चाहत्यांनी त्याला 'फैनत' असे नाव दिले आहे. शोच्या दरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली आहे. फैझू वाईल्ड कार्डने धमाकेदार पुनरागमन करेल आणि टॉप 2 मध्ये स्थान मिळवू शकेल.

फैजू 'झलक दिखला जा १०' मध्ये दिसणार

मात्र, 'खतरों के खिलाडी १२'चे शूटिंग संपले आहे. मिस्टर फैजू आता 'झलक दिखला जा सीझन १०' मध्ये दिसणार आहे. अशा परिस्थितीत 'खतरों के खिलाडी' संपल्यावर चाहत्यांना झलक दिखला जामध्ये त्यांचे आवडते स्टार पाहायला मिळणार आहेत.