Kiara Sidharth Wedding : 'आता मी पर्मनंट तुझीच!' लग्नानंतर कियाराची पहिलीच पोस्ट, चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.गेल्या काही दिवसांपासून हे कपल चर्चेत आले होते.
KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA
KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA esakal

Kiara Adwani Sidharth Malhotra Wedding actress : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.गेल्या काही दिवसांपासून हे कपल चर्चेत आले होते. दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी तिच्या भावी आय़ुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

लग्नानंतर पहिल्यांदाच कियाराची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं जे म्हटले आहे त्यावरुन नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. आपण आता पर्मनंटली तुझी झाले असे म्हटले आहे. या पोस्टनं चाहत्यांनी कियाराला भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. शेरशाह चित्रपटामध्ये सिद्धार्थ तिला ज्याप्रकारे प्रपोझ करतो त्याच धर्तीवर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्सही व्हायरल झाले आहेत.

Also Read - प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

राजस्थानातील जैसलमेर येथे कियारा आणि सिद्धार्थचा शाहीविवाह पार पडला. त्याला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी देखील उपस्थित होते. सोशल मीडियावर रात्री उशिरा त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोंवर चाहत्यांनी दिलेल्या भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावरुन मात्र बॉलीवूडमधील सलमानला ट्रोल केले गेले आहे. आतातरी लग्न कर अशा प्रकारचे मीम्स व्हायरल झाले असून ते लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA
Kiara-Sidharth Wedding Photo : 'तेरी मेरी गल्लां हो गई मशहूर...' शेरशाहचा शाही विवाहसोहळा

कियारानं लग्नानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली असून ती नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नावरुन चर्चा होती. राजस्थानातील जैसेलमेरमध्ये झालेल्या या लग्नावरुन सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स तर कमालीचे भन्नाट आहेत.

KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA
Sidharth Kiara Wedding: वरुण धवनपासून ते कतरिनापर्यंत, या सेलिब्रिटींनी सिड-कियाराला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com