नो बँडबाजा, नो गाजावाजा: शांततेत होणार लिएंडर पेस - किमचं दुसरं लग्न|Kim Sharma Leander pages ready to marriage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kim Sharma leander paes ready to marrige

नो बँडबाजा, नो गाजावाजा: शांततेत होणार लिएंडर पेस - किमचं दुसरं लग्न

Entertainment News: अभिनेत्री किम शर्माचं (Actress Kim Sharma) नाव जेव्हा प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसशी (Leander Paes) जोडलं गेले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते.हे दोन्ही सेलिब्रेटी यापूर्वी त्यांच्या गतकाळातील रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले होते. आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी त्यांना (Bollywood Actress) वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी किमनं तिच्या (viral news) इंस्टावरुन लिएंडर सोबतचा फोटो शेय़र केला होता. त्यावर तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. विशेष कुठलाही गाजावाजा न करता ते विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. Kim Sharma leander paes ready to marrige

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाचं ग्रँड सेलिब्रेशन होणार नाही. ते कोर्ट मॅरेज करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यावर किम आणि लिएंडरकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी लग्नाची बातमी ऐकून आनंद व्यक्त केला आहे. काही वर्षांपासून किम लिएंडर एकमेकांना डेट करत आहे. पेसला त्याच्या आई वडिलांकडून लग्नाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. दोघांच्या कुटूंबियांना हे लग्न मान्य आहे. मात्र त्याचे ग्रँड सेलिब्रेशन होणार नाही असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी पेसच्या कुटुंबियांनी किमच्या पालकांची भेट घेतली होती.

हेही वाचा: किम शर्मा-लिएंडर पेसच्या ख्रिसमसची रोमँटिक सुरुवात; किसिंग फोटो केला पोस्ट

मुंबईतील बांद्रयामध्ये मध्ये किमचं घर आहे. त्याठिकाणी लग्नाची बोलणी झाली आहे. हे लग्न कोर्ट मॅरेज पद्धतीनं होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी देखील दोन्ही कुटूंबियांची कोलकातामध्ये भेट झाली होती. किमनं 2010 मध्ये बिझनेसमन अली पुनजानीसोबत लग्न केलं होतं. मात्र ते नातं फारकाळ टिकलं नाही. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिचं नाव क्रिकेटर युवराज सिंगसोबतही जोडलं गेलं होतं. काही वर्षांपासून ती लिएंडर पेसच्या रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. आता ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Web Title: Kim Sharma Leander Pages Ready To Marriage Social Media Viral News Three Years Dating

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top