Kiran Mane: दहा फ्लाॅप आणि एखादा हिट देणारा 'सुपरस्टार' कसा? किरण मानेंची सणसणीत पोस्ट

किरण मानेंची सध्याच्या नटांना उद्देशुन सणसणीत पोस्ट लिहीली आहे
kiran mane new post on marathi actors and congratulate prashant damle
kiran mane new post on marathi actors and congratulate prashant damle SAKAL

किरण माने हे मनोरंजन विश्वातील आघाडीचे अभिनेते. किरण माने सोशल मीडियावर विविध विषयांवर त्यांची परखड मतं व्यक्त करत असतात. किरण मानेंनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी विष्णुदास भावे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत दामलेंचं अभिनंदन केलंय तर सध्याच्या कलाकारांवर तिरकसपणे भाष्य केलंय.

kiran mane new post on marathi actors and congratulate prashant damle
Boyz 4: दिवाळीची खास ऑफर! गौरव मोरेचा बॉईज 4 पाहा आता फक्त .. रुपयात

किरण माने लिहीतात, "...हल्ली मराठीत काही चॅनलवाल्यांनी जाहिरात चमकदार करण्याच्या नादात 'सुपरस्टार', 'महानायक' असे शब्द लैच स्वस्त करून टाकलेले आहेत. उठसूठ कुणाही आठदहा सिनेमात किंवा नाटकात दिसलेल्या नटाला 'सुपरस्टार' हे पद देतात चिकटवून बिनधास्त. दहा फ्लाॅप आणि साता-नवसातून एखादा हिट देणार्‍यालाही 'महाराष्ट्राचा महानायक'वगैरे टॅग लावून देतात. त्यामुळे आजकाल हा शब्द लैच गुळगुळीत झालाय. त्या शब्दाचं महत्त्वच कमी झालंय.पण खरंच, खरा 'सुपरस्टार' कोण असतो??

सिनेमा किंवा नाटक, चांगलं असेल तर चालतंच... पण ज्या नटावरच्या केवळ प्रेमासाठी प्रेक्षक त्याचा वाईट सिनेमा किंवा वाईट नाटकही आवर्जुन थिएटरपर्यन्त जाऊन पहातात.. अमिताभचे कित्येक भंगार सिनेमेही किंवा काशिनाथ घाणेकरांची वाईट नाटकंही लोकांनी गर्दी करकरून पाहिली. शाहरूखचा 'पठाण' हा वाईट सिनेमाही सुप्परडुप्पर हिट्ट झाला. हे खरे सुपरस्टार !"

किरण माने पुढे लिहीतात, "आजच्या काळात मराठी सिनेमात असा एकही अभिनेता नाही, ज्याच्यावरील केवळ प्रेमापोटी लोक त्याचा 'वाईट सिनेमा'ही थिएटरपर्यन्त जाऊन, तिकीट काढून पहातात कुणीही नाही ! त्यामुळे मराठी सिनेमाला अशोकमामा-लक्ष्यामामा हे शेवटचे सुपरस्टार लाभले असं म्हणता येईल."

किरण माने शेवटी लिहीतात, "पण नाटकात मात्र आजही असा सुपरस्टार आहे. ज्याचं कुठलंही नाटक लागलं की, फक्त त्याच्या नांवावर 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड लागतोच ! नाटक चांगलं असो वा वाईट, ते कमीत कमी अडीचशे ते तीनशे प्रयोग करतंच ! त्याचं नांव वन ॲन्ड ओन्ली प्रशांत दामले. मी स्वत: त्याच्यासोबत 'श्री तशी सौ' हे नाटक केलंय. बारा वर्षांपूर्वी. नाटकात मी 'श्री' आणि वंदना गुप्ते 'सौ'. प्रशांत दामले सुत्रधाराच्या भुमिकेत होता. दामलेची लोकप्रियता 'याची देही याची डोळा' पहायला मिळाली. उभा-आडवा महाराष्ट्रच नव्हे तर इंग्लंड-स्काॅटलंड मधले दौरेही हाऊसफुल्ल झालेले अनुभवले... विशेष म्हणजे त्याची ती लोकप्रियता आमच्या नाटकाच्या दहा वर्ष आधीही होती, आणि आजही टिकून आहे !

मराठी व्यावसायिक नाटकाच्या या सुपरस्टारला काल मराठी रंगभूमी दिनानिमित्त 'विष्णूदास भावे पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं. 'नाटक' या कलाप्रकाराला पूर्णवेळ वाहून घेतलेल्या अस्सल नाटकवाल्याला हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. सलाम दामलेज्... लब्यू."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com