Kiran Mane: किरण माने साकारणार 'हकीमचाचा'.. 'रावरंभा'मध्ये मिळाली दमदार भूमिका..

'बिग बॉस' नंतर किरण माने चित्रपटात..
Kiran Mane play hakim chacha role in upcoming ravrambha marathi movie cast om bhutkar release date
Kiran Mane play hakim chacha role in upcoming ravrambha marathi movie cast om bhutkar release datesakal

kiran mane in ravrambha movie: किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. ते आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे असले तरी त्यामागे त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. अनेक वर्षे मालिका, चित्रपट, नाटक करून त्यांनी नाव लौकिक मिळवला आहे.

किरण माने यांना बिग बॉस मराठी नंतर खऱ्या अर्थाने मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या त्यांचा फॅन क्लब जबरदस्त वाढला आहे. त्यामुळे किरण माने कधी नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार याची चाहते वाट पाहत होते. अशातच एक मोठी घोषणा किरण माने यांनी आहे.

किरण माने लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहेत. त्याचेच खास पोस्टर आज माने यांनी शेयर केले आहे.

(Kiran Mane play hakim chacha role in upcoming ravrambha marathi movie cast om bhutkar pravin tarde release date)

Kiran Mane play hakim chacha role in upcoming ravrambha marathi movie cast om bhutkar release date
Manoj Bajpayee Birthday: त्यावेळी भर कार्यक्रमात कतरिनाने मनोज वाजपेयीचे पाय धरले होते; कारण..

किरण माने हे आगामी 'रावरंभा' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात माने यांनी महत्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रेलर लॉंच सोहळ्यात त्यांचा पहिला लुक समोर आला होता. माने यांच्या लुक सह एक पोस्टर आउट झालं आहे.

''मालिका, चित्रपट, नाटकांमधून चाहत्यांची मनं जिंकणारे बिग बॉस फेम मराठीतील प्रतिभावंत आणि हरहुन्नरी अभिनेते किरण माने 'हकीमचाचा' च्या अनोख्या भूमिकेत.. ''असे कॅप्शन या पोस्टरला देण्यात आले आहे.

यामध्ये माने काळा पागोटा, अंगावर शेला आणि लांब पांढरी दाढी अशा लुक मध्ये दिसत आहेत. त्यांच्या लुकवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यांचे कौतुक केले आहे.

निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली असून येत्या १२ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता ओम भूतकर प्रमुख भूमिकेत आहे. तर अपूर्वा नेमळेकर, अभिनेता संतोष जुवेकर ही या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com