Kiran Mane shared photo and talks about fans celebrity
Kiran Mane shared photo and talks about fans celebritysakal

Kiran Mane: फॅन्स तो सेलिब्रिटी के होते है.. मेरे तो.. किरण मानेची ती पोस्ट आणि चर्चेचा उधाण..

किरण माने यांनी खास फोटो शेयर केला आहे.

kiran mane: कलाकार म्हंटलं की प्रसिद्धी आली आणि प्रसिद्धी म्हंटलं की त्यांचे चाहते हे आलेच.. कलाकार कितीही मोठा असला तरी तो रसिकांच्या प्रेमा शिवाय अपूर्ण आहे. कलाकारांनाही हे प्रेम हवच असतं.

कलाकारांचे असंख्य फॅन्स असतात. पण कलाकार आणि सेलेब्रिटी यात फरक असतो असे किरण माने यांचे म्हणणे आहे. याच संदर्भात त्यांनी एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी कलाकार आणि सेलेब्रिटी यांच्यातील फरक अगदीच चपखल पणे मांडले आहे, तसेच फॅन्स आणि प्रेम करणारी माणसं यात काय फरक आहे हेही त्यांनी सांगितलं आहे.

(Kiran Mane shared photo and talks about fans celebrity)

Kiran Mane shared photo and talks about fans celebrity
Chrisann Pereira: अभिनेत्री क्रिसन परेराची तुरुंगातून सुटका; ड्रग्ज तस्करी प्रकरणात झाली होती अटक..

किरण माने यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की किरण माने हे काही मुलांमध्ये उभे आहेत. विशेष म्हणजे सर्व मुलांनी किरण माने यांच्या चेहऱ्याचा मुखवटा घातला आहे. आणि सर्वांनी आपल्या हाताची मूठ आवळून विजयाची मुद्रा दाखवली आहे.

त्यामुळे या फोटोत अनेक किरण माने आपल्याला दिसत आहे. ग्रामीण भागातील हा फोटो असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे किरण माने यांनी याला एक भन्नाट कॅप्शन दिले आहे.

''फॅन्स तो सेलिब्रिटी के होते है... मेरे 'चाहनेवाले' हैं !'' असं किरण माने यांनी म्हंटलं आहे. किरण यांनी अत्यंत सूचक विधान केलं आहे. अनेकदा आपण बघतो की सेलिब्रिटी आणि फॅन्स यांच्यात दरी पाहायला मिळते. पण किरण माने यांच्या बाबतीत तसं नाही. ते थेट चाहत्यांमध्ये जाऊन मिसळतात, ते त्यांचे होऊन जातात.

किरण माने यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. या फोटोला आणि त्यांच्या कमेंटला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे. बिग बॉस मराठी नंतर त्यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली असून त्यांचे चाहते आता महाराष्ट्रभर पसरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com