Kiran Mane: मराठीतला 'हा' सुपर व्हिलन साकारण्यासाठी किरण माने झाले होते सज्ज.. पण ऐनवेळी..

किरण माने यांनी फोटो शेयर करत सांगितला खास अनुभव..
kiran mane shared post about he wanted to play super villain rajshekhar in marathi movie
kiran mane shared post about he wanted to play super villain rajshekhar in marathi movie sakal

kiran mane: किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. ते आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे असले तरी त्यामागे त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. अनेक वर्षे मालिका, चित्रपट, नाटक करून त्यांनी नाव लौकिक मिळवला आहे.

किरण माने यांना बिग बॉस मराठी नंतर खऱ्या अर्थाने मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या त्यांचा फॅन क्लब जबरदस्त वाढला आहे. कुणाला ते हीरो वाटतात तर कुणाला चळवळीचे कार्यकर्ते. पण खऱ्या आयुष्यात हीरो सारख्या असणाऱ्या किरण माने यांनी एकदा चक्क सुपर व्हिलन साकारण्याची तयारी केली होती.

एका चित्रपटात ते मराठीतील एका दिग्गज सुपर व्हिलन सारखी भूमिका रंगवणार होते. सगळी तयारी झाली पण मध्येच एक अडचण आली. याच विषयी एक खास किस्सा किरण माने यांनी सांगितला आहे.

(kiran mane shared post about he wanted to play super villain rajshekhar in marathi movie)

kiran mane shared post about he wanted to play super villain rajshekhar in marathi movie
Rinku Rajguru Video: चांगभलं! म्हणत आर्चीनं घेतलं ज्योतिबाचं दर्शन.. व्हिडिओ व्हायरल..

किरण माने म्हणतात, ''एक जुनी आठवण... माझा मित्र दिग्दर्शक विहार घाग याच्या सिनेमासाठी झालेली ही लूक टेस्ट. मी व्हिलन रंगवणार होतो. जुन्या मराठी तमाशापटांची आठवण व्हावी असे कथानक होते.''

''आपले मराठीतले जुने सुपर व्हिलन होते - 'राजशेखर' ! विहार त्यांचा जबरी फॅन. हा खलनायक मी राजशेखर यांच्यासारखा साकारावा अशी विहारची इच्छा होती. आम्ही गेटअपपासून सगळी तयारीही केली होती. अनेक अडचणी येत गेल्या आणि पिच्चर आलाच नाही... जुने फोटो चाळताना त्यावेळच्या लूक टेस्टचा हा फोटो सापडला...'' अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

राजशेखर म्हणजे मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवलेला अभिनेता. चित्रपटात व्हिलन हवा तर ते राजशेखरच अशी त्यांची ख्याती झाली होती. त्यांच्याच पायावर पाय ठेवून एक तगडा खलनायक साकारण्याची तयारी किरण माने यांनी केली होती, पण ती संधी त्यांना मिळाली नाही.

किरण माने सध्या रोज काहीतरी आठवणी शेयर करत आहेत. आज त्यांनी त्यांच्याच एका भूमिकेची आठवण सांगितली आहे. लवकरच ते 'रावरंभा' चित्रपटात झळकणार आहेत. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये किरण माने आगामी काळात झळकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com