Kiran Mane: हरूनही जिंकल्यासारखं वाटतंय, कारण.. किरण मानेचा हा व्हिडिओ बघाच..

साताऱ्यातून शेयर केलेली किरण मानेची ही पोस्ट बघाच..
Kiran Mane shared video post about experience and fan love in vathar satara after bigg boss marathi 4
Kiran Mane shared video post about experience and fan love in vathar satara after bigg boss marathi 4sakal

Kiran Mane: गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

यंदाच्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वात किरण माने सहभागी झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन किरण मानेंनी जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळंच स्थान निर्माण केलं

बिग बॉस मधून बाहेर आल्यावर किरण मानेंचा ठिकठिकाणी जाहीर सत्कार होतोय. गावागावातून त्यांना आमंत्रण येतंय.. अशाच एका गावात जाऊन तर थक्क झाले, भारावून गेले.. तोच अनुभव त्यांनी व्हीडिओतून शेयर केला आहे.

(Kiran Mane shared video post about experience and fan love in vathar satara after bigg boss marathi 4)

नुकतेच किरण माने साताऱ्यातील 'वाठार' येथे गेले होते. त्यांच्या झाकीरभाई या मित्राच्या सासूरवाडीला.. तोच अनुभव मानेंनी पोस्ट मध्ये सांगितलं आहे.

माने म्हणाले आहेत, 'बिगबाॅसनं ह्यावेळी आमच्या ग्रामीण भागात पार धुरळा उडवून दिला राव ! आपला मातीतला रांगडा गडी लढतोय याचं लै कवतीक होतं सगळ्यांना.

मी बाहेर आल्यापास्नं एक दिवस चैन नाय. रोज एका गांवात सत्कारासाठी आवतान हाय. जिंकून आल्यासारखा माहौल करत्यात माझ्या जिवातली मानसं. लै भारी वाटतंय.''

Kiran Mane shared video post about experience and fan love in vathar satara after bigg boss marathi 4
Rakhi Sawant Mother Dies: आई गेली तरी राखीचा ड्रामा संपेना! नेटकऱ्यांनी अक्षरशः लाज काढली..

''...काल माझा जिगरी दोस्त झाकीरभाई म्हन्ला, "लगा एक दिवस वेळ काढ की. माझ्या वाठारला सासुरवाडीचे लोक दालचा खाना खायाला बोलावत्यात तुला." यास्मीनभाभी तर लै दिवस आग्रह करत्यात. वेळच मिळत नव्हता.''

''काल म्हन्लं, चल उद्या जाऊया. तिकडं वाठार स्टेशनला बातमी पसरली की अलीम सय्यद, अल्ताफ सय्यद, हाफिज यांचे मेहुणे किरण मानेंना घेऊन जेवायला येतायत. मला भेटायला गावकरी बंधूभगिनींची एकच झुंबड उडाली. वाठारच्या सरपंच सौ. निता माने यांनीही समक्ष भेटून माझं स्वागत केलं.''

''सगळंच भारावून टाकणारं घडतंय. एक कलाकार म्हणून या प्रेमाची परतफेड मी फक्त माझ्या कलेतूनच करू शकतो. मी त्यात कणभरबी कसर ठेवनार नाय याची खात्री देतो. मनापासून आभार !.. '' असा अविस्मरणीय अनुभव किरण माने यांनी सांगितला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com