Laapataa Ladies Movie : किरण रावचा बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित ‘लापता लेडीज’ ची रिलिज डेट जाहीर

किरण राव या बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहेत.
Kiran Rao producer director Laapataa Ladies Movie
Kiran Rao producer director Laapataa Ladies Movie esakal
Updated on

Kiran Rao producer director Laapataa Ladies Movie : किरण राव या बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहेत. केवळ आमिर खानची एक्स वाईफ एवढीच काही त्यांची ओळख नाही. त्या दिग्दर्शिका आणि निर्मात्या म्हणूनही बॉलीवूडमध्ये ओळखल्या गेल्या आहेत. आता त्यांच्या लापता लेडिजची विषयी जोरदार चर्चा सुरु आहे.

ज्यांनी धोबी घाट किंवा शिप ऑफ थिसस नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना किरण राव कोण हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. गेल्या काही दिवसांपासून त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्यांचा लापता लेडिज प्रेक्षकांसमोर येतो आहे. जिओ स्टुडिओ आणि आमिर खान प्रॉडक्शन्स यांनी किरण राव दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट 'लापता लेडीज' प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे.

किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील विनोदी जगाची एक आनंददायी झलक या चित्रपटाच्या टीझरमधून सिनेप्रेक्षकांपर्यंत आधीच पोहोचली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट अनुभवण्याची उत्सुकता लागली आहे. अलीकडेच प्रतिष्ठित ‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स’मध्ये ‘लापता लेडीज’ चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून चित्रपटाच्या दिग्दर्शिका किरण राव यांना मानवंदना दिली, अशा पद्धतीने या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त करीत जागतिक स्तरावर अमिट छाप उमटवली आहे.

Kiran Rao producer director Laapataa Ladies Movie
Shah Rukh Suhana Khan : बापलेक दिसणार एकाच चित्रपटात, शाहरुख अन् सुहाना च्या चित्रपटाची घोषणा, सुजाय घोष करणार दिग्दर्शन

१ मार्च २०२४ रोजी 'लापता लेडीज' सिनेगृहांमध्ये दाखल होत आहे. प्रेक्षकांची उत्कंठा अधिक शिगेला नेण्याकरता, निर्मात्यांनी ‘लापता लेडीज’च्या विलक्षण दुनियेत डोकावता येईल, अशा एका नवीन पोस्टरसह या विनोदी, रंजक अशा चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट असून सिनेरसिकांना एक सिनेमॅटिक मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे, या चित्रपटाला जागतिक स्तरावर खूप दाद मिळाली आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘लापता लेडीज’ चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले असून आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्स आणि ‘किंडलिंग प्रॉडक्शन्स’च्या बॅनर अंतर्गत बनविण्यात आला आहे. चित्रपटाची पटकथा बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांचे असून, अतिरिक्त संवाद दिव्यानिधी शर्मा यांनी लिहिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.