
Kirron Kher: किरण खेर यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्या लोकांना केले हे आवाहन
Bollywood News : अभिनेत्री किरण खेर यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. किरण खेर यांनी ट्विट करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे. किरण खेर यांनी 20 मार्च रोजी ट्विटरवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
त्यांनी कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर चाचणी केली. त्यांनी ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर हे ट्विट केलं आहे. ‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’, असे त्यांनी लिहिले आहे.
चाहते किरण खेर यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट करत किरण यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
किरण खेर यांना 2021 मध्ये रक्ताचा कर्करोग झाला होता. या संदर्भात त्य्नाचे पती आणि अभिनेते अनुपम खेर आणि मुलगा सिकंदर खेर यांनी ती आता निरोगी असल्याचे अपडेट शेअर केले होते.
कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर किरण खेर 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसल्या होत्या . अनुपम खेर आणि किरण खेर 1985 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. अनुपम यांच्या आधी किरणचे लग्न उद्योगपती गौतम बेरीसोबत झाले होते.
अभिनेत्री किरण खेर यांनी बर्याच चित्रपटात आईची भूमिका साकारली आहे. किरणने संजय लीला भन्साळीच्या ‘देवदास’मध्ये ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये या पात्राने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली.
तसेच यानंतर, ‘वीर-झारा’, ‘ओम शांती ओम’, ‘हम-तुम’, ‘रंग दे बसंती’ अशा बर्याच चित्रपटांमध्ये किरण आईच्या भूमिकेत दिसल्या आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांकडून त्यांना खूप प्रेम मिळालं.