Kirron Kher: आता अनारकली बनून मुजरा कर.. किरण खेर यांनी करण जोहरची उडवली खिल्ली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirron Kher tells Karan Johar ‘tu anarkali ban ke aaya hua hai’ in Diwali video

Kirron Kher: आता अनारकली बनून मुजरा कर.. किरण खेर यांनी करण जोहरची उडवली खिल्ली!

kirron kher and karan johar: दिवाळीनिमित्त अनेक बॉलिवूड स्टार्सनी घरी पार्टीचे आयोजन केले त्यापैकी अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीचे सर्वाधिक चर्चा होत आहे. पार्टीचे अनेक न पाहिलेले व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले. आता एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये असे आहे की युजर्स या बॉलिवूड स्टार्सना ट्रोल करताना दिसतात पण आता बॉलिवूड स्टार्स एकमेकांना ट्रोल करत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत करण जोहर आणि किरण खेर खूप दिवसांनी एकमेकांना भेटले. हे दोघे 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसले होते. जिथे दोघांच्या फन बॉन्डिंगने अनेकदा चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता समोर आलेल्या या नवीन व्हिडिओमध्येही तेच पाहायला मिळत आहे. दिवाळी पार्टीच्या या व्हिडिओमध्ये किरण खेर करणला वाईटरित्या ट्रोल करताना दिसत आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात अमृता फडणवीस गाणार का? खास एंट्री!

किरण खेर (kirron kher) बसून काहीतरी खात आहे, जेव्हा करण जोहर तिच्याजवळ पोहोचतो आणि फोन काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच किरण म्हणते "आधी तुझा फोटो घे." तर करण किरण यांच्या ड्रेसचा रंग पाहून, गमतीने म्हणतो, "तुम्हाला करवा चौथला थोडा उशीर झाला असे वाटत नाही का."

करणच्या (karan johar) या मुद्द्यावर किरण भडकत म्हणते "तू तुझं तोंड बंद कर. अनारकली बनून आला आहेस, थोड्याच वेळात इथे मुजरा करणार आहेस." यावेळी ती करणच्या चालीची खिल्ली उडवते आणि म्हणते, "इथे ती अश्या चालीचे कोण नाही, तु जे इथून तिथून करत आहे. तुझ्यात दुसरी कोणतीही स्त्री तर नाही."

किरण खेरच्या ड्रेस वर करण म्हणतो, मला वाटते की मी तुझा ड्रेस आधी कुठेतरी पाहिला आहे." यावर किरणने उत्तर दिले की, हे खास माझ्यासाठी बनवले आहे, त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही की तुम्ही तो याआधी कुठेतरी पाहिला असेल. मग दोघांनी एकमेकांच्या व्यक्तिमत्वाची खिल्ली उडवली आणि किरण म्हणाली, "मी तुझ्यापेक्षा खूप चांगली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. हे तुलाही माहीत आहे."