
kishori pedneakar : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप आमदार पंकजा मुंडे अशा अनेक दिग्गज महिला सहभागी झाल्या आहेत. आता या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्या पक्ष आणि राजकारण यावर बरच काही बोलल्या. एवढेच नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर पण त्या बोलल्या.
(kishori pednekar participate in bus bai bus show on zee marathi she said mumbai Mumbai has become pothole free)
शिवसेनेच्या आक्रमक आणि तडपदार नेत्या म्हणजे किशोरी ताई पेडणेकर. केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी झी मराठी वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी सुबोध भावे यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरं दिली. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.
यावेळी सुबोध भावे किशोरी ताईंना विचारतात, मुंबई खड्डे मुक्त होणं शक्य आहे का? त्यावर किशोरी पेडणेकर म्हणतात.. 'होय हे शक्य आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही मुंबई खड्डे मुक्त करण्याचे काम सुरू केले. यावर्षी मुंबईत जवळपास खड्डे नाहीतच,' असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. यावर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. मुंबई खड्डेमुक्त झाली नसल्याने अनेकांनी टीका देखील केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.