मंत्रिपद मिळालं की पक्षनिष्ठा संपते! किशोरी पेडणेकर यांचे मोठे विधान.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar participate in bus bai bus show on zee marathi she talks about shivsena eknath shinde and maharashtra politics election

मंत्रिपद मिळालं की पक्षनिष्ठा संपते! किशोरी पेडणेकर यांचे मोठे विधान..

kishori pedneakar : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप आमदार पंकजा मुंडे अशा अनेक दिग्गज महिला सहभागी झाल्या आहेत. आता या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्या पक्ष आणि राजकारण यावर बरच काही बोलल्या. एवढेच नाही बंडखोर आमदारांवरही त्यांनी सडेतोड टीका केली. (kishori pednekar participate in bus bai bus show on zee marathi she talks about shivsena eknath shinde and maharashtra politics election)

शिवसेनेच्या आक्रमक आणि तडपदार नेत्या म्हणजे किशोरी ताई पेडणेकर. केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी झी मराठी वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी सुबोध भावे यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरं दिली. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या राजकीय गदारोळावर भाष्य केले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षनिष्ठेवरही बोट ठेवले. त्यांच्या या राजकीय गप्पा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

या कार्यक्रमात सुबोध भावे किशोरी परेडणेकरांना प्रश्न विचारतात की, आमदार पळून जाणं, हे सरकारी यंत्रणेचं अपयश असतं कसं? त्यावर किशोरी पेडणेकर म्हणतात, 'नाही.. ही सर्वस्वी पक्षाची जबाबदारी आहे. सरकारी यंत्रणांनी आधीच माहिती दिली होती. ते सोडून जाणार याची कल्पनाही होती. पण आम्ही समजूत घालत होतो. परंतु एखाद बाळ हट्टालाच पेटल्यावर आपला नाईलाज होतो. ज्याची फळं आज आपण भोगतोय.'

पुढे सुबोध विचारतात, 'शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी सोडून गेलेल्या आमदारांचं मन वळवावं लागेल का? त्यावर किशोरी म्हणतात, 'हो.. पण आमदारांचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचा कही उपयोग झाला नाही. शेवटी झाडाला कलम केल्यावर नवी पालवी फुटते तशी आमच्या शिवसेना पक्षालाही नव्याने पालवी फुटेल. आमचा बाळासाहेबांचा पक्ष जसा आहे आजही तसाच आहे. आम्हाला जिंकून देणारे लोक आजही आमच्याबरोबर आहेत.'

पण पक्षाला नवीन पालवी जर फुटणार असेल तर जुन्या लोकांची मनं वळवावी लागतील का? असं पुढे सुबोध पुन्हा विचारतो. यावर त्या म्हणतात, 'आता वळणं भरपूर झाली. मन वळवण्याच्या ते बाहेर गेले आहेत. पुन्हा ते शक्य नाही.' पुढे सुबोध विचारतात, 'मंत्रीपद मिळाल्यावर पक्षाची निष्ठा संपते का?' या प्रश्नावर किशोरीताई म्हणतात, 'होय.. संपते.. ते दिसतंच आहे..' या कार्यक्रमात झालेल्या राजकीय गप्पा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Web Title: Kishori Pednekar Participate In Bus Bai Bus Show On Zee Marathi She Talks About Shivsena Eknath Shinde And Maharashtra Politics Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..