esakal | Video : माधुरीच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स
sakal

बोलून बातमी शोधा

kishori shahane

Video : माधुरीच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्लस वाहिनीवरील 'गुम है किसी के प्यार मे' Ghum Hai Kisikey Pyaar Meiin ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. या मालिकेतील बहुतांश कलाकार हे मराठी इंडस्ट्रीतील असून अभिनेत्री किशोरी शहाणे Kishori Shahane यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. चव्हाण कुटुंबातील प्रमुख भवानी चव्हाणच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या भूमिकेला जरी नकारात्मक छटा असली तरी एकंतर त्यांचं अभिनय प्रेक्षकांना चांगलंय भावलंय. सध्या मालिकेच्या सेटवरील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत त्या सहकलाकारासोबत माधुरी दीक्षितच्या Madhuri Dixit प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहेत. (kishori shahane dance on madhuri dixit badi mushkil song watch video)

मालिकेत करिश्माची भूमिका साकारणारी स्नेहा भवसार आणि किशोरी शहाणे यांनी शूटिंगदरम्यान मिळालेल्या फावल्या वेळेचा उपयोग करत डान्सचा हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. माधुरीच्या 'बडी मुश्कील' या गाण्यावर किशोरींनी ठेका धरला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलं आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या किशोरी यांचा उत्साह पाहून नेटकरीसुद्धा अवाक् झाले आहेत.

हेही वाचा: मराठी मालिका गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या किशोरी शहाणेंनी 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावली होती. सध्या मालिकेच्या सेटवरील धमाल-मस्तीचे फोटो, व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. मालिकेतील त्यांचा 'मस्त हा मस्त' हा संवादसुद्धा चांगलाच गाजला आहे.

हेही वाचा: त्या काळात कपूर कुटुंबानेही फिरवली होती आईकडे पाठ; करीनाचा खुलासा