Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer : ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल, 'म्हातारा झालाय पण...!'

यापूर्वी सलमानच्या या चित्रपटातील नय्यो लगदा नावाचे गाणे व्हायरल झाले होते. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. ते गाणं काही चाहत्यांना भावलेही. मात्र...
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Salman Khan movie
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Salman Khan movie

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Salman Khan movie : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलरची गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर तो ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. त्यावर सलमानला आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी सलमानच्या या चित्रपटातील नय्यो लगदा नावाचे गाणे व्हायरल झाले होते. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. ते गाणं काही चाहत्यांना भावलेही. मात्र त्यावरुन त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले होते. वयाच्या साठी जवळ आलेल्या सलमानचा तो डान्स पाहून नेटकऱ्यांना हसू आवरले नव्हते. सलमान भलेही त्याच्या हटके स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखला जात असला तरी त्यानं केलेल्या डान्सवर नेटकरी भडकले होते. त्यांनी त्याच्यावर यथेच्छ टीका केली होती.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सलमान या वयात तू जे काही करतो आहे हे तुला पटते का, तू बॉलीवूडचा सिनिअर हिरो आहेस तेव्हा तुला वेगळ्या भूमिका का नाही कराव्याशा वाटत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सलमानला दिल्या होत्या. त्यानंतर तीन ते चार दिवसांपूर्वी लुंगी डान्सचे गाणे प्रदर्शित झाले. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला, मात्र त्यावरुन सलमानच्या लुंगी डान्सनं वेगळाच वाद समोर आला होता. अनेकांना तो डान्स आवडला नसल्याचे त्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आहे.

आता सलमानच्या किसी का भाई किसी की जानचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र तो ट्रेलर चाहत्यांना फारसा प्रभावित करताना दिसत नसल्याचे दिसून आले आहे. त्याचे मीम्सही आता व्हायरल होऊ लागले आहे. काही जणांनी पुन्हा सलमानला त्यावरुन ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. म्हातारा सलमानला अजुनही हिरो होण्याचा मोह काही सुटेना, अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. पण सोशल मीडियावर अवघ्या काही वेळात ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद तुफान आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Salman Khan movie
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा 'लुंगी डान्स' संकटात .. दक्षिण भारतातील परंपरेचा अपमान झाल्याची होतेय ओरड..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com