त्या किसिंग सिनचा बोलबाला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

गायक के प्रतीकचं नवं गाणं "कैसा नशा'ची सोशल मीडियावर धूम पाहायला मिळतेय.

मुंबई : गायक के प्रतीकचं नवं गाणं "कैसा नशा'ची सोशल मीडियावर धूम पाहायला मिळतेय. शौर्य खरे आणि आकाश प्रताप सिंह यांनी हे गाणं लिहिलं आहे. शौर्य खरे या गाण्याचे निर्माते आहेत.

हे गाणं अशा सुंदर जोडीची गोष्ट दाखवतं की ज्यात, आपसातील छोट्या भांडणांमुळे ते एकमेकांपासून दूर गेले होते. परंतु, एका मित्राच्या पार्टीत पुन्हा एकत्र येतात. या दरम्यान, त्यांच्यात पुन्हा नवीन नातं तयार होतं आणि आपल्या जुन्या आठवणींमध्ये रममाण होतात.

गाण्याच्या व्हिडीओमध्ये अर्चना सिंह राजपूत आणि शौर्य यांच्यातील रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि किसिंग सीन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

3 मिनिटं 59 सेकंदाचा या गाण्याचा व्हिडीओ झी म्यूझिक कंपनीच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. या गाण्याचे व्ह्यूज आणि लाईक्‍सची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. सोशल मीडियावरही या गाण्याचा चांगलाच बोलबाला दिसत आहे. अर्चना ही सुप्रसिद्ध मॉडल आहे; तर शौर्य सुप्रसिद्ध संगीतकार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That Kissing Sin caused this song to be talked about on social media