esakal | 'बिग बॉस 2'चा महाविजेता शिव ठाकरे आहे तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

'बिग बॉस 2'चा महाविजेता शिव ठाकरे आहे तरी कोण?

अनेक हटके कारणांमुळे चर्चेत असलेल्या मराठी 'बिग बॉस सीझन 2'ची ग्रँड फिनाले आज पार पडला. या पर्वाचा महाविजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे!

'बिग बॉस 2'चा महाविजेता शिव ठाकरे आहे तरी कोण?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : अनेक हटके कारणांमुळे चर्चेत असलेल्या मराठी 'बिग बॉस सीझन 2'ची ग्रँड फिनाले आज पार पडला. या पर्वाचा महाविजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे! बिग बॉसचा शंभर दिवसांचा खडतर प्रवास पूर्ण करून या शिवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आज (ता. 1) आपलं नाव कोरले. अभिनेत्री नेहा शितोळे आणि शिव ठाकरे यांच्यात अंतिम फेरी रंगली आणि शिव 'बिग बॉस 2' जिंकला.

'बिग बॉस सीझन 2' चा महाविजेता ठरलेला शिव ठाकरे कोण आहे?

शिव ठाकरेचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव मनोहर ठाकरे तर त्याच्या बहिणीचे नाव मनिषा ठाकरे आहे. शिव ठाकरे हा उच्च शिक्षित असून, त्याने नागपुरातील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बीईचे शिक्षण घेतले. 

तसेच 2015 मध्ये त्याची निवड 'रोडिज् रायझिंग'मध्ये झाली. त्यानंतर तो तिथं जाण्यास पुन्हा इच्छुक होता. पण मागील सिजनमध्ये त्याची निवड झाली नाही. शिव ठाकरे याने एडीए प्रोडक्शनच्या 'मिस्टर अँड मिस इंडिया'च्या अंतिम फेरीत त्याने परीक्षकाची भूमिकाही बजावली.

loading image
go to top