Ranveer Deepika Wedding Video: अखेर ५ वर्षांनी रणवीर - दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ समोर, करण जोहर भावुक

रणवीर - दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ भेटीला, व्हिडीओ पाहून करण जोहर गहिवरला
koffee with karan 8 ranveer singh - deepika padukon wedding video release
koffee with karan 8 ranveer singh - deepika padukon wedding video release SAKAL

Ranveer Deepika Wedding Video: कॉफी विथ करण 8 सध्या चांगलंच चर्चेत आहे. करण जोहर होस्टींग करत असलेल्या कॉफी विथ करण शोची सध्या चांगलीच हवा आहे.

या शोच्या नवीन सीझनमध्ये रणवीर सिंग - दीपिका पादुकोण सहभागी झाले आहेत. अशातच या शोमध्ये लग्नानंतर पाच वर्षांनी पहिल्यांदाच रणवीर - दीपिकाचा लग्नाचा व्हिडीओ समोर आलाय.

(koffee with karan 8 ranveer singh - deepika padukon wedding video release)

koffee with karan 8 ranveer singh - deepika padukon wedding video release
Elvish Yadav: धक्कादायक! बिग बॉस विजेता एल्विश यादवला अज्ञात व्यक्तीकडून फोन, काय म्हणाला माहितीये?

रणवीर - दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ

'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनचा पहिला भाग आज, २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री रिलीज झाला. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच विवाहित जोडपे म्हणून एकत्र दिसल्याने, एपिसोडमध्ये काही मोठे खुलासे होणार होते.

रणवीरने दीपिकासोबत लग्न करणं ही मनोरंजन विश्वातील मोठी घटना होती.

लग्नाच्या व्हिडिओमध्ये रणवीर - दीपिकाच्या लग्नातील हृदयस्पर्शी क्षण दिसतात — रणवीरने दीपिकाचा मेकअप फिक्स करणे, लग्न समारंभाच्या काही क्षण आधी तिच्यावरील प्रेम जाहीर करणे, दीपिकाच्या डोळ्यातील अश्रु पुसणं, वेडिंग रिसेप्शन आणि बरेच काही.

लग्नाच्या व्हिडिओमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या कुटुंबीयांकडून बाइट्स देखील दाखवण्यात आले होते.

लग्नाचा व्हिडीओ पाहून करण जोहर भावुक

रणवीर - दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ पाहून करण जोहर भावुक झालेला दिसला. करण जोहर म्हणाला, "मी गेली अनेक वर्ष सिंगल आहे. मलाही वाटतं की, माझी तुमच्यासारखी एखादी स्टोरी असावी. जी स्टोरी मी जगाला सांगु शकेल."

करण जोहरचे डोळे पाणावले होते. एकुणच कॉफी विथ करण मध्ये इतका सुंदर व्हिडीओ पाहुन कोणाच्याही डोळ्यात आनंदाश्रु येतील यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com