Koffee With Karan: ऐकावं ते नवल! करण जोहर - डेव्हिड धवनचं होतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koffee With Karan:

Koffee With Karan: ऐकावं ते नवल! करण जोहर - डेव्हिड धवनचं होतं?

Koffee With Karan Finale: करणच्या बाबत जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आपल्या वेगवेगळ्या कारणामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आताही तो त्याच्या कॉफी विथ करणमुळे लाईमलाईटमध्ये आला आहे. करण हा बोल्डनेससाठी ओळखला जातो. त्यानं आपली ओळख, वैयक्तिक आयुष्य, प्रेमप्रकरणं ही काही कुणापासून लपवून ठेवली नाहीत. त्यानं त्याच्या शोमध्ये केलेल्या एका विधानानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. वास्तविक यापूर्वी बॉलीवूडच्या पुरस्कार सोहळ्यातमध्ये करणला त्या प्रश्नांवरुन छेडण्यात आले होते.

कॉफी विथ करणच्या शो चा अखेरचा एपिसोड आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्या फिनाले मध्ये एआयबी फेम तन्मय भट्ट आणि सोशल मीडिया कुषा कपिला सहभागी होणार आहे. त्याच्या प्रोमोचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. करण त्याच्याच शोमध्ये शांत झाल्याचे पहिल्यांदाच दिसते आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे.

त्या फिनालेमध्ये करण जोहरच्या रिलेशनशिपवरुन चर्चा सुरु झाली आहे. फिनालेमध्ये निहारिका एनएम, दानिश सैत देखील दिसणार आहेत. शोच्या ट्रेलरवरुन करणला ट्रोल करण्यात येत आहे. करण जोहर शोमध्ये जुरीला विचारतो की, मी नेहमीच माझ्या शोमध्ये आलियाचे नाव घेत असतो का, तुम्हाला त्याचा राग येतो का, त्यावर त्याला दानिश उत्तर देतो की, ती ब्रम्हास्त्रमध्ये जशी शिवा, शिवा, शिवा असा आवाज देत असते तसा तू तुझ्या शोमध्ये आलिया, आलिया असं करत असतो.

हेही वाचा: Nikki Tamboli : सडपातळ निक्की तांबोळीने जिंकले मन; फोटो करतात घायाळ

यासगळ्यात करणनं बोलताना जुग जुग जियोच्या कास्टसमोर आपल्या एक्स विषयी हिंट दिली. जी आता चर्चेत आली आहे. त्यावरुन करणला ट्रोल देखील करण्यात येत आहे. त्यावेळी निहारिका करणला त्याचे नाव घेण्याचा आग्रह करते. करण जोहर म्हणतो, वरुण धवनला बॉय डिफॉल्ट आपल्या रिलेशनशिपविषयी माहिती झाले होते. तेव्हा तन्मय करणला म्हणतो, तू काय डेव्हिड धवनला डेट करत होतास का, यावर करणचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

हेही वाचा: Nikki Tamboli: निक्कीला पाहावं, शांत व्हावं!