Konkona Sen Sharma: लग्नाआधी प्रेग्नंट, मग घटस्फोट आणि राष्ट्रीय पुरस्कार.. कोण आहे कोंकणा सेन शर्मा?

अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचा आज वाढदिवस, तया निमित्ताने जाणून घेऊया ही खास बात.
Konkona Sen birthday she became pregnant before marriage, won the National Award twice
Konkona Sen birthday she became pregnant before marriage, won the National Award twice sakal

Konkona Sen Sharma : अत्यंत निवडक, मोजके पण गहन आशयाचे. सामाजिक भाव असलेले चित्रपट करणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन शर्मा. तिच्या सामाजिक जाणिवा, तिची समज, तिची चित्रपटांचीन निवड याविषयी आवर्जून कौतुक केले जाते.

विशेष म्हणजे तिच्या दमदार अभिनयामुळे तीला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पण कोंकणा तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत आहे, तितकेच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही बोलले जाते. आज कोंकणा तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया, तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी..

(Konkona Sen birthday she became pregnant before marriage, won the National Award twice )

Konkona Sen birthday she became pregnant before marriage, won the National Award twice
Bigg Boss Marathi 4: किरण माने इथं डोळा मारायला आलाय.. राखीनं घेतली फिरकी..

कोंकणाने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे तिच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले. कोंकणाला हा वारसा घरातूनच मिळाला आहे. कोंकणाची आई अपर्णा सेन एक उत्कृष्ट दिग्दर्शिका आहे.

तर तिचे वडील मुकुल शर्मा हे प्रसिद्ध पत्रकार होते. कोंकणाने बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. 1983 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'इंदिया' या बंगाली सिनेमात कोंकणा झळकली होती. त्यानंतर 2002 साली प्रदर्शित झालेला तिचा 'तितली' या सिनेमातही ती होती.

Konkona Sen birthday she became pregnant before marriage, won the National Award twice
Sumeet Raghvan: आरे आंदोलक फालतू आणि बोगस! व्हिडिओ शेअर करत सुमीत राघवनचं वादग्रस्त ट्विट

कोंकणाचा 2006 साली 'ओंकारा' आणि 2007 साली 'लाइफ इन अ मेट्रो' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले गेले. या सिनेमांसाठी सलग दोन वर्ष तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

कोंकणाला तिच्या चित्रपटामुळे नावाजले गेलेच. पण तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही बरीच चर्चेची वादळं उठली. विशेष म्हणजे जेव्हा ती लग्ना आधीच गरोदर राहिली, तेव्हा अनेकांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. झाले असे की, '' कोंकणा 'आजा नच ले' हा कार्यक्रम करत होती. त्यावेळी या कार्यक्रमाच्या सेटवर तिची ओळख अभिनेता रणवीर शौरीबरोबर झाली. पुढे त्यांची छान मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2007 पासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 3 सप्टेंबर 2010 साली ते लग्नबंधनात अडकले आणि 15 मार्च 2011 साली कोंकणाला मुलगा झाला. त्यामुळे ती लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचं बोललं गेलं.'

त्यानंतर त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि 2015 साली ते विभक्त झाले. पतीपासून विभक्त झाल्यापासून कोंकणा एकटी आपल्या मुलाचा सांभाळ करत आहे.

'पेज 3' या सिनेमाने कोंकणाला वेगळी ओळख मिळाली. या सिनेमातील माधवी शर्मा, 'लिपस्टिक अंडर माय बुर्खा' सिनेमातील शिरीन असलम, 'अजीब दास्तान'मधली भारती मंडल या कोंकणाच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. कोंकणाला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तीला दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com