कोरियन सुपरस्टार 'माऊस' फेम किम मिन क्युंग कालवश

कोरियन चित्रपटांचा korean movie मोठा प्रेक्षकवर्ग आपल्याला जगभरात पाहायला मिळतो.
कोरियन सुपरस्टार 'माऊस' फेम किम मिन क्युंग कालवश

मुंबई - कोरियन चित्रपटांचा korean movie मोठा प्रेक्षकवर्ग आपल्याला जगभरात पाहायला मिळतो. आशयसंपन्न अशी ओळख त्या चित्रपटांची आहे. कोरियन चित्रपटप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे साऊथ कोरियातील प्रसिद्ध अभिनेत्री किम मिन क्युंग kim min kyung या अभिनेत्रीचं निधन झालं आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. साऊथ कोरियातील एका वेब पोर्टलनं याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपासून किम ही सियोलमधील एका रुग्णालयात दाखल होत्या. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. कोरियन सुपरस्टार आणि माऊस या चित्रपटात आपल्या भूमिकेनं किम यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांच्या निधनानं कोरियन चित्रपट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

१९७९ मध्ये किम यांनी अभिनेत्री म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांना सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. त्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. १९८१ मध्ये कोरियामध्ये झालेल्या थिएटर फेस्टिव्हलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. त्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रेटी होत्या. वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडणं, प्रतिक्रिया देणं यासाठी त्या ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय जगभरातील सिनेपत्रकारांनी त्यांच्या निधनाची दखलही घेतली आहे.

कोरियन सुपरस्टार 'माऊस' फेम किम मिन क्युंग कालवश
राज कुंद्राच्या सुटकेवर होणार २५ ऑगस्टला निर्णय...

केवळ चाहतेच नव्हे तर समीक्षकांनी देखील त्यांच्या अभिनयाचं कौतूक केलं होतं. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. त्यांचा अभिनय पाहणं हे सिनेरसिकांसाठी वेगळी पर्वणी असे. किम मिन यांनी तज्जा, समवन बिहाइंड यु, व्हेअर द ट्रुथ लाईज सारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. याशिवाय त्यांनी द मुन इमब्रेसिंग द सन, व्हॅन कमिला ब्ल्युम्स सारख्या नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. किम यांच्या माऊस आणि ए गुड सपर चित्रपटांमध्ये दिसल्या. त्यातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केले होते. त्यांच्या आणखी दोन फिल्म प्रदर्शित होणं बाकी आहे. त्यावर त्या कधी प्रदर्शित होणार यावर अद्याप निर्मात्यांनी निर्णय घेतलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com