निव्वळ बेशिस्तीमुळं अभिनेत्रीनं गमावला, अमिताभ यांचा सिनेमा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत मुख्म भूमिकेसाठी क्रितीची निवड करण्यात आली होती. पण, क्रिती आता या चित्रपटाचा भाग नाही. कारण...

मुंबई : बॉलिवूडमध्ये दिग्गज कलाकारांसोबत सिनेमे करण्यासाठी मेहनत आणि नशीब दोन्ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे इन्डस्ट्रीमध्ये आलेले नवीव कलाकार दिग्गज कलकारांसोबत काम करण्यासाठी धडपड करत असतात. दिवाळीमध्ये आलेल्या 'हाउसफुल 4' ने बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. त्यामध्ये अक्षय कुमार, क्रिती सॅनन, क्रिती खारबंदा, बॉबी देओल, रितेश देशमुख, चंकी पांडे, नवाझुद्दीन सिद्धीकी, पूजा हेगडे अशी दमदार कास्ट होती. त्यामधील क्रिती खारबंदाचा अभिनयही कौतुकास्पद होता.  'हाउसफुल 4' च्या यशानंतर क्रिती 'पागलपंती' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@deme_love_ @stevemadden @theanisha @13kavitadas @aliyashaik28 @kvinayak11 #voguexnykaafashionpowerlist2019

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda) on

प्रमोशनसाठी क्रिती आणि 'पागलपंती' ची टीम बिग बॉसच्या शोमध्ये पोहोचली होती. क्रितीला यावेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि तिने त्याची लक्षणीय उत्तरेही दिली. क्रितीला 'चेहरे' या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले होते. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत मुख्म भूमिकेसाठी क्रितीची निवड करण्यात आली होती. पण, क्रिती आता या चित्रपटाचा भाग नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I’m COOL. yea 

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda) on

क्रितीच्या बेशिस्तीमुळे तिच्या हातून हा चित्रपट गेला आहे. काही रिपोर्टच्या माहितीनुसार, क्रितीचे नखरे आणि तिच्या टीमच्या गैरव्यवस्थेमुळे हा सिनेमा तिच्या हातून गेला आहे. तिच्या टीमने क्रितीच्या कामाच्या तारखांमध्ये गैरव्यवस्था आणि निष्काळजीपणा केला. चित्रपटाचे निर्माते क्रितीच्या मागणीनुसार आणि वेळेनुसार बदल करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर ते सर्व फेल गेले आणि क्रितीला हा चित्रपट मिळाला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Feeling all kinds of #friyay (Hawaa ka jhonka+perfect light+caught in the moment+feeling yay)

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda) on

शिवाय असंही बोललं जात होत की, क्रिती आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांमध्ये अनेक मतभेद होते. त्यामुळे चित्रपट तिच्याशिवाय करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. सिनेमाचे निर्माते आता दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधामध्ये आहेत. या चित्रपटामध्ये आता कोणती अभिनेत्री दिसणार हे पाहावं लागेल. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2020 च्या एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kriti Kharbanda Lost The Film Opposite Amitabh Bachchan because of her behavior