KRK In RSS: 'माझं ठरलं RSS मध्ये जातोय!' केआरकेचं ट्विट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK wants To Join RSS News

KRK In RSS: 'माझं ठरलं RSS मध्ये जातोय!' केआरकेचं ट्विट चर्चेत

KRK Tweet News: बॉलीवूडचा वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान अर्थात केआरके हा काही शांत बसायला तयार नाही. त्यानं आता ट्विट करुन एक मोठा धक्का त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना दिला आहे. आपल्या अशाच वादग्रस्त ट्विटमुळे त्याला जेलची हवा खावी लागली होती. सध्या तो जामिनावर बाहेर असून त्यानं घेतलेल्या राजकीय निर्णयाची चर्चा सुरु झाली आहे. केआरकेनं केलेलं ट्विट त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी असल्याचे म्हटले जातेय.

केआरकेच्या व्हायरल झालेल्या त्या ट्विटमध्ये त्यानं आपण आता नागपूरला जाणार असून लवकरच आरएएसमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. काही वेळेपूर्वी त्यानं केलेल्या त्या व्टिटला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. केआरकेनं काही दिवसांपूर्वी आपण राजकीय निर्णय घेणार असल्याचे सोशल मीडियावरुन सांगितले होते. आता तर त्यानं थेट नागपूरला जाऊन आरएसएसमध्ये जाणार असल्याचे ट्विट केले आहे.

हेही वाचा: Bramhastra: आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'पुढं सारं फिकं! ती जिंकली

केआरकेचं बोलणं, त्याचे सोशल मीडियावर ट्विट हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचे विषय असतात. आताही त्यानं केलेल्या त्या व्टिटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. माझं आता फायनली ठरलं आहे. की मी लवकरच नागपूरला जाऊन आरएसएसमध्ये सहभागी होणार आहे.

हेही वाचा: Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...