
Shahrukh Khanची ऑन स्क्रिन मुलगी अंजलीचा साखरपुडा दणक्यात..
'कुछ कुछ होता है' (Kuch Kuch Hota Hai) चित्रपटात शाहरुख खानची मुलगी अंजलीची भूमिका साकारून सना सईद (Sana Saeed) रातोरात स्टार बनली. सनाने या चित्रपटात काम केले तेव्हा ती खूपच लहान होती. असे असूनही सनाने शाहरुखच्या चित्रपटात चांगला अभिनय केला आहे.
सना सईद आता मोठी झाली आहे. यासोबतच क्यूट दिसणारी अंजली आता खूपच ग्लॅमरसही झाली आहे. दरम्यान, नववर्षानिमित्त सना सईदने तिच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. सना सईदने बॉयफ्रेंड सबा वॉर्नरसोबत एंगेजमेंट केली.
हेही वाचा: Bigg Boss 16: एमसी स्टॅनसाठी काहीपण! बिग बॉसच्या घरातच लाइव कॉन्सर्ट दणक्यात..
सना सईद आणि सबा वॉर्नरने त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सबा वॉर्नर सनाला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. सबाची ही स्टाईल पाहून सनाचा आनंद सातव्या गगनाला भिडतो. या क्लिपमध्ये सना आणि सबा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कधी ते एकमेकांना किस करत आहेत तर कधी सना तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये जिथे सना काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तिथे साबाही खूप स्टायलिश दिसत आहे. सनाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. चाहते या क्लिपवर जोरदार कमेंट करत अभिनंदन करत आहेत.
हेही वाचा: Tunisha Sharma Death Case : 'तुनिषा काही कमी नव्हती तिनं तर...' शिझानच्या वकीलाचा धक्कादायक खुलासा
सबा वॉर्नर आणि सना सईद खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सबा वॉर्नर हॉलिवूडची साउंड डिझायनर आहे. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. सबा अनेकदा सनासोबतचे फोटो शेअर करत असते.