अभिनेता चंद्रचूड सिंहला करण जोहरने ऑफर केला होता 'कुछ कुछ होता है'?

kuch kuch hota hai was offered to chandrachur singh by karan johar
kuch kuch hota hai was offered to chandrachur singh by karan johar
Updated on

मुंबई : बॉलीवूडमध्ये काही सेलिब्रिटी असे असतात ज्यांचं पदार्पण एकदम धमाकेदार असतं पण नंतर मात्र ते अचानक इंडस्ट्रीमधून गायब होतात. बॉलीवूडमधील असाच एक अभिनेता आहे जो त्याची एन्ट्री धमाकेदार करून बी टाऊनमधून गायब झाला आहे. त्याचं नाव आहे चंद्रचूड सिंघ. अनेक हिट सिनेमांमधून अभिनयाची चुणूक दाखवलेल्या चंद्रचूडची चाहत्यांमध्ये चांगली क्रेझ होती..मात्र अचानक असं काय झालं की तो बॉलीवूड मधून अचानक गायब झाला?

हेही वाचा: 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदीने बीचवर केलेला डान्स होतोय व्हायरल
'माचीस' सारखा अप्रतिम सिनेमा करण्याव्यतिरिक्त 'तेरे मेरे सपने', 'जोश', 'क्या केहना', 'दाग: द फायर', 'आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया'सारखे अनेक हिट सिनेमे दिले. मात्र खूप कमी लोकांना माहीत आहे की करण जोहर सारख्या निर्मात्याने चंद्रचूडला त्याच्या सिनेमासाठी ऑफर दिली होती.
प्रसिद्ध निर्माता करण जोहरने त्याचा सुपरहिट सिनेमा 'कुछ कुछ होता है' मध्ये सलमान खानने साकारलेली भूमिका ऑफर केली होती मात्र चंद्रचूडने ही ऑफर नाकारली. याबाबत एका प्रसिद्ध वेबसाईडला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूडने सांगितलं होतं की, त्याच्या सिने कारकीर्दीमधील ही सगळ्यात मोठी चूक होती. हा एक चांगला सिनेमा होता जो त्याने स्वीकारला नाही. त्यानंतर मग त्याचे सगळेच सिनेमे अडकले. आणि तो निराश झाला.
चंद्रचूडने सांगितलं की तब्बू सोबत त्याच्या 'दरिया' या सिनेमाची घोषणा झाली आणि मग हा सिनेमा अडकला. त्यानंतर चंद्रचूडला दीपा मेहताच्या 'अर्थ' सिनेमामधून देखील काढलं आणि त्याची भूमिका राहुल खन्नाला मिळाली. एका मोठ्या ब्रेकनंतर चंद्रचूड सिंघने सुश्मिता सेन सोबत सोबत 'आर्या' या वेबसिरीजमधून पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com