जान कुमार सानूने केलेल्या आरोपांवर कुमार सानू म्हणाले, ''यापुढे मुलाला कधीही भेटणार नाही''

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 25 November 2020

वडिल कुमार सानू यांच्या पालनपोषणाबाबत  अनेक उपस्थित केलेल्या प्रश्नावर विरोध दर्शवत त्याने जानने म्हटलं की त्यांनी कधी माझी आणि माझ्या आईची जबाबदारी घेतली नाही. या संपूर्ण प्रकरणावर आता कुमार सानू यांनी मौन सोडलं आहे.  

मुंबई- बिग बॉस १४ मधून गायक जान कुमार सानू नुकताच बाहेर पडला. या शोमध्ये स्पर्धक निक्की तंबोलीसोबत चर्चेत राहिलेला जान घराबाहेर पडताच त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वडिल कुमार सानू यांच्या पालनपोषणाबाबत  अनेक उपस्थित केलेल्या प्रश्नावर विरोध दर्शवत त्याने जानने म्हटलं की त्यांनी कधी माझी आणि माझ्या आईची जबाबदारी घेतली नाही. या संपूर्ण प्रकरणावर आता कुमार सानू यांनी मौन सोडलं आहे.  

हे ही वाचा: सैफ अली खानची वेबसिरीज 'दिल्ली'चं नाव बदललं, 'या' नावाने होणार रिलीज  

गायक कुमार सानू यांनी सांगितलं की जानच्या अशा बोलण्याने त्यांना खूप दुःख झालं आहे. इतकंच नाही आता जर असं म्हटलं जात असेल की मी काहीच नाही केलं तर माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे. कुमार सानू यांनी सांगितलं की, ''जान खूप लहान होता त्यामुळे त्याला माहित नसेल की जेव्हा २००१ मध्ये जेव्हा  घटस्फोट झाला तेव्हा त्याच्या आईला मागितलेली प्रत्येक गोष्ट दिली होती. तिला कोर्टच्या माध्यमातून जे काही मागितलं ते सगळं दिलं. एवढंच काय तर माझा आशिकी बंगला देखील दिला. माझा मुलगा मला भेटत असायचा. मात्र आता जरी त्याला भेटायची इच्छा असेल तरी मी त्याला भेटणार नाही.''

कुमार सानू यांनी पुढे सांगितलं की, ''जेव्हा मला कोरोनाची लागण झाली होती तेव्हा मला त्या घरातून एकही फोन आला नाही. आत्तापर्यंत नाही. जानने देखील माझी आत्तापर्यंत काही विचारपुस केलेली नाही. प्रेम एकतर्फी कधीच नसतं आणि टाळी एका हाताने वाजत नाही. त्यांना जेव्हा केव्हा पाहिजे असायचं तेव्हा ते माझ्याशी प्रेमाने वागायचे. आता जेव्हा तो बिग बॉसमध्ये आला तेव्हा तो वेगळं बोलायला लागला.कधी मी त्यांच्यासाठी चांगला असतो, ते स्वतःला भाग्यवान समजतात की कुमार सानू त्याचे वडिल आहेत तर कधी बोलतात की डॅडी खूप वाईट आहेत. वयाच्या साठीत आता हेच ऐकणं बाकी राहिलं होतं.''  

kumar sanu reacts to son jaan kumar sanu allegations says now i will never meet my son  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumar sanu reacts to son jaan kumar sanu allegations says now i will never meet my son