...जबाबदारी नाहीच, कुणाल कामराची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका | Kunal Kamra Comment On PM Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kunal Kamra And Narendra Modi

...जबाबदारी नाहीच, कुणाल कामराची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

काॅमेडियन कुणाल कामराने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे. त्यानंतर लोकांनी त्याला सुनावले आहे. कुणाल म्हणाला, मोदी केवळ एक अशी व्यक्ती आहे ज्यांना ट्विटरवर कोणत्याही ट्विटला उत्तर द्यावे लागत नाही. पुढे तो लिहितो, एकमात्र भारतीय जे आपल्या ५ वर्ष जुन्या ट्विट्ससाठी उत्तरदायी नाहीत, ते आहेत मोदी. कामरा यांच्या ट्विटवर शुभम नावाच्या युजर म्हणाला, ते तुमचे आणि त्याबरोबरच आपले पंतप्रधान आहेत, तुम्ही कोणाशीही कितीही तिरस्कार करत असाल किंवा टिकाकार असाल. मात्र तुम्हाला अनेक कारणांमुळे त्या व्यक्तीचा सन्मान करणे आवश्यक आहे. ती आहे ज्येष्ठता. त्यांचे पद आणि भारतीय लोकांचे प्रतिनिधी असणे. (Kunal Kamra Attack On Prime Minister Narendra Modi On His Tweets)

हेही वाचा: बीड जिल्ह्यातील ३९ भाविक अमरनाथमध्ये अडकले; प्रशासन, कुटुंबीय संपर्कात

अनमोल नावाच्या युजरने कामराच्या जुन्या ट्विटमध्ये त्याने भाजप महाराष्ट्रात आल्यास स्वतःला तुरुंगात टाकण्याचे म्हटले होते. त्याविषयी आठवण करुन दिली. अगोदर स्वतःच्या ट्विटबाबत उत्तरदायी तर बना. आता असं म्हणू नको की ते माझ्या तोंडातून निघून गेले होते, असा टोला अनमोल यांनी कुणाल कामराला लगावला. स्वतःविषयी सांगा, तुरुंगात कधी जात आहात, असे रोहित म्हणाला. सुमित समादे म्हणतो, नरेंद्र मोदींच्या नावावरुन आपली उपजीविका चालवणाऱ्या एकमेव नाॅन-काॅमेडियन आहे कुणाल कामरा (Kunal Kamra).

हेही वाचा: शिक्षण नोकरीपुरतेच मर्यादित; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत

कामराने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली नाही. त्यापूर्वीही त्याने पंतप्रधानांवर टीका केलेली आहे. मोदी सरकारच्या अग्निवीर योजना घेऊनही तो म्हणाला होता, की स्वतः म्हातारपणासाठी १५ वर्षांचे नियोजन बनवून ठेवले आहे. आणि देशाचे जवान ४ वर्ष सैन्यात राहिल्यानंतर ड्रीम ११ वर टीम बनवावे? या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी दरम्यानही कुणाल सतत ट्विटवरुन भाजपवर टीका करत होता. त्यानंतर लोकांनी त्याला आठवण करुन दिली. त्यात तो म्हणाला होता, की अगोदर महाराष्ट्रात सरकार बनवा, मग स्वतःला तुरुंगात टाकेल.

Web Title: Kunal Kamra Attack On Prime Minister Narendra Modi On His Tweets

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..