रंग दे बसंती फेम कुणाल ऑलिम्पियन हिरोवर साकारणार बायोपिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kunal kapoor

रंग दे बसंती फेम कुणाल ऑलिम्पियन हिरोवर साकारणार बायोपिक

मुंबई - रंग दे बसंती फेम (rang de basanti) अभिनेता कुणाल कपूर (kunal kapoor) आता अभिनयाकडून निर्मितीच्या क्षेत्रात जाणार आहे. त्यानं त्याविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. प्रभावी अभिनय यासाठी कुणाल कपूरचं नाव घ्यावं लागेल. त्यानं आता आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा देखील केली आहे. मी जेव्हा सहाय्यक दिग्दर्शक होतो तेव्हापासून लिहिण्याचे काम करतो आहे. आणि आता माझ्याकडे बराचसा अनुभव गोळा झाला आहे. त्याचा वापर करुन नवीन काही करायचं. असा निर्णय मी घेतला आहे.

कुणाल कपूरनं आपल्या नव्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. त्यात त्यानं सहा वेळा विजेता असणारा विंटर ऑलिम्पियन शिव केशवन वर बायोपिकची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियाज् फास्टेट मॅन ऑन आइस या नावानं देखील त्या व्यक्तिमत्वाला ओळखले जाते. शिव केशवनच्या बायोपिकवर आता कुणालनं कामही सुरु केलं आहे. शिवचीच गोष्ट तुला का सांगावीशी वाटली या प्रश्नावर त्यानं सांगितलं की, तो एक अविश्वसनीय असा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्याचा मी निर्णय घेतला.

मला केशवनच्या व्यक्तिमत्वातील आवडलेली गोष्ट म्हणजे त्यानं सहा वेळा भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. आणि ही गोष्ट जास्त प्रभावी आहे. तो ज्या क्रिडा प्रकारात आहे तो अतिशय अवघड आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर आपण यशस्वी होणं स्वाभाविक आहे. मात्र प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन यशस्वी होणं जास्त भावणारं आहे. असं मला वाटतं. आणि ती गोष्ट शिव केशवनकडे आहे.

कुणाल कपूरनं यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यातील सर्जनशीलतेचा परिचय करुन दिली आहे. त्याच्या या प्रयोगांना प्रेक्षकांचंही पाठबळ लाभलं होत. आपल्या आगळ्या आणि हटके अभिनयानं कुणालनं बॉलीवूडमध्ये नाव कमावलं आहे. त्याचा प्रेक्षकवर्गही वेगळा आहे. त्याच्यावर प्रेम करणारा आहे. 10 वर्षांहून अधिक काळ तो या चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आहे. मात्र आता त्याची भूमिका बदलली आहे. त्यामुळे त्यानं प्रॉडक्शनमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Kunal Kapoor Launch Own Production House First Project Will Be Olympian Shiv Keshavan Yst

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top