'तुला पाहून घाम सुटला..बाप रे..खतरनाक..', मानसी नाईकच्या व्हिडीओवर कुशल बद्रिके लट्टू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kushal Badrike Comment On Manasi Naik Video

Manasi Naik: 'तुला पाहून घाम सुटला..बाप रे..खतरनाक..', मानसी नाईकच्या व्हिडीओवर कुशल बद्रिके लट्टू

Manasi Naik: मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. आता मानसीनं अर्थातच हे स्पष्ट केलं आहे की ती खरोखरच आपला पती प्रदीप खरेरापासून विभक्त होत असून कोर्टात केस दाखल झालेली आहे. मानसीनं यादरम्यान आपल्या पतीवर आणि सासरच्यांवर आरोप केल्याचं देखील समोर आलं होतं. घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान मानसी नाईक सोशल मीडियावर पोस्ट करत असलेले तिचे व्हिडीओ देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्याचं पहायला मिळत आहे. आता मानसीनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे,ज्याच्यावर अभिनेता कुशल बद्रिकेनं दिलेली कमेंट चर्चेत आली आहे.

हेही वाचा: Swasthyam 2022 : शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योगाभ्यास

मानसी नाईक या नवीन शेअर केलेल्या व्हिडीओत वर्कआऊट करताना दिसत आहे. पण यात ती इतकं कठीण वर्कआऊट करताना दिसतेय त्यानं नक्कीच पाहणाऱ्याला घाम सुटेलच. त्यामुळे कुशल जे बोलला आहे ते अगदी १०० टक्के खरंय. मानसीनं हा व्हिडीओ पोस्ट करत दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे ज्याचं तिच्या घटस्फोटाशी नकळत कनेक्शन जुळतंय. मानसीनं लिहिलं आहे की, Real Goals :
Being Financially
Mentally
Academically
Physically
Spiritually
And Emotionally STABLE
Thank you Universe

यातनं हेच तर म्हणायचं आहे मानसीला..की हेच माझं ध्येय...कडक मेहनतीनं आर्थिकदृष्ट्या,मानसिकदृष्ट्या,शारिरीकदृष्ट्या,अध्यात्माच्या दृष्टीनं ,भावनिकदृष्ट्या....स्वतःला मजबूत करावं....

मानसीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र अगदी पहिली प्रतिक्रिया आहे जी अभिनेता कुशल बद्रिकेनं दिली आहे, त्यानं लिहिलं आहे की,''तुझी ही मेहनत पाहून मला घाम आला,बाप रे..खतरनाक...''. कुशल तसा मिश्किल स्वभावाचा...त्यामुळे अर्थातच त्याच्या या कमेंटमधनं देखील त्याचा तो स्वभाव दिसून येतोय. अन् त्यामुळेच तर या कमेंटची मानसीच्या व्हिडीओपेक्षा अधिक चर्चा रंगलेली दिसून येत आहे.