Laal Singh Chaddha: आमिरच्या लाल सिंग चढ्ढावर तीन राज्यांमध्ये 'बंदी?'|Laal Singh Chaddha Aamir Khan movie banned | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laal Chadha Singh movie news

Laal Singh Chaddha: आमिरच्या लाल सिंग चढ्ढावर तीन राज्यांमध्ये 'बंदी?'

Laal Singh Chaddha movie news: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खान हा त्याच्या लाल सिंग चढ्ढा यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून लाल सिंग चढ्ढा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर बहिष्कार (Bollywood Actor Aamir Khan) टाकण्यांसंबंधीची चर्चा सोशल मीडियावर व्हाय़रल झाली आहे. यासगळ्यात बॉलीवूडचा अभिनेता केआरके अर्थात कमाल राशिद खाननं (Bollywood Movies) एक वेगळाच खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यानं देशातील तीन राज्यांमध्ये लाल सिंग चढ्ढावर बंदी घालण्यात आल्याचा दावा केला आहे. आमीरनं मुलाखतींतून प्रेक्षकांना त्याचा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले असताना दुसरीकडे त्याच्याबाबत सुरु असलेला वाद अजुन वाढताना दिसतो आहे.

केआरके हा सोशल मीडियावर सक्रिय असणारा अभिनेता आहे. तो अभिनयापेक्षा त्याच्या वादासाठी जास्त लाईमलाईटमध्ये असणारा सेलिब्रेटी आहे. त्याचा बॉलीवूडच्या खान मंडळींवर विशेष राग असल्याचे त्याच्या यापूर्वीच्या पोस्टवरुन दिसून आले आहे. त्यानं सलमान खानच्या राधे या चित्रपटाचा रिव्ह्यु केला होता. तो सलमानला न आवडल्याने त्यानं कमाल खानवर खटला भरला होता. कमालनं आपली बदनामी केल्याचा दावा सलमाननं केला होता. यापूर्वी त्यानं बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांशी पंगा घेतल्याचे दिसून आले आहे.

Krk tweet viral news

Krk tweet viral news

केआरकेचं म्हणणं आहे की, लाल सिंग चढ्ढावर तीन राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्याचं ट्विट हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही आल्या आहेत. केआरके त्या व्टिटमध्ये म्हणतो की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा यांच्यासहित आणखी काही राज्यांमध्ये लाल चढ्ढा सिंगवर बंदी घालण्यात आली आहे. असं केआरकेनं म्हटलं आहे.

हेही वाचा: Mahesh Manjrekar: 'KGF 2 पाहिल्यावर तुम्हाला उठून जावसं वाटलं नाही का?' इतका वाईट...

केआरकेचे वेगवेगळे व्टिट्स व्हायरल झाले आहे. त्यातील बहुतांशी हे लाल सिंग चढ्ढाशी संबंधित आहे. केआरके म्हणतो, त्या राज्यांमध्ये लाल सिंग चढ्ढा हा अनऑफिशियली बॅन करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमीरच्या लाल सिंगवरुन वाद सुरु आहे. काही थिएटर चालकांनी हा चित्रपट लावावा की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे. असे केआरकेनं म्हटलं आहे.

हेही वाचा: De Dhakka 2: मराठी माणसाला कधी कमी लेखायच नाही, 'दे धक्का 2' चा धमाकेदार ट्रेलर..

Web Title: Laal Singh Chaddha Aamir Khan Movie Banned Up Mp Hariyana Krk Tweet Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..