Laapataa Ladies Collection Day 3 : पहिल्या तीन दिवसांत चार कोटींची कमाई! 'लापता लेडिज' 'हिट की फ्लॉप'?

आमिर खानच्या लापता लेडिजचं (Laapataa Ladies Collection Day 3) बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे. त्यावरुन चर्चेला उधाण आलं आहे.
Laapataa Ladies latest news
Laapataa Ladies latest newsesakal

Laapataa Ladies Box Office Collection 3 day : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची निर्मिती असलेल्या आणि किरण रावचं दिग्दर्शन असलेल्या लापता लेडिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सध्याच्या घडीला मिळालेला प्रतिसाद पाहता येत्या काळात तो मोठी कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

किरण रावनं अकरा वर्षानंतर लापता लेडिजच्या निमित्तानं दमदार कमबॅक केलं आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी स्विकारले असून त्याचा रिव्ह्यूही उत्तम आहे. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांनी किरण रावच्या या चित्रपटाला आपली पसंती दर्शवली आहे. आतापर्यत या चित्रपटानं तीन दिवसांत चार कोटींची कमाई केली आहे. रविवारच्या दिवशी या चित्रपटानं पावणे दोन कोटींची कमाई केली आहे.

एका आगळ्या वेगळ्या विषयांवरील या चित्रपटामध्ये नवविवाहीत दाम्पत्य आणि त्यांची भन्नाट कथा मोठ्या प्रभावीपणे साकारण्यात आली आहे. ज्याची चर्चा होत आहे. सध्या तरी आमिर खान आणि किरण राव हे दोघेजण आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

यापूर्वी किरण रावचा लापता लेडिज हा जगभरातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झाला होता. तिथेही त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अशातच किरण रावला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा असून येत्या काळात तो आणखी मोठी कमाई करेल असेही सांगितले जात आहे. कमाईच्याबाबत सांगायचे झाल्यास भारतातून चैन्नईमधून या चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.

Laapataa Ladies latest news
Laapataa Ladies Marathi Review: पत्नी हरवल्याचे दुःख आणि मग... विनोदाबरोबरच सामाजिक संदेश देणारा लापता लेडीज

चेन्नई नंतर बंगळुरु आणि पुण्यातूनही या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. जिओ स्टुडिओ, काईंडली पिक्चर्स आणि आमिर खान यांच्यावतीनं लापता लेडिज नावाच्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com