'तुमचं आयुष्य त्यांच्यावरच अवलंबून आहे'; लेडी गागाचा फेव्हर कुणाला?

Lady gaga tweet on American president election get viral
Lady gaga tweet on American president election get viral

मुंबई - महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत चुरशीच्या या लढाईत नेमका कुणाचा विजय होणार हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. या महत्वाच्या पदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तसेच अनेक महत्वाच्या सेलिब्रेटींनी आपआपल्या आवडत्या उमेदवारांना पाठींबा दिला आहे. त्यात प्रख्यात गायिका लेडी गागाने केलेल्या व्टिटमुळे ती चर्चेत आली आहे.

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका ठरल्याप्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तुल्यबळ  लढत होईल, असं सांगण्यात येत आहे. पण, निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणांमध्ये अमेरिकी नागरिक बायडेन यांच्या बाजूने असल्याचे दिसत आहे.

यासगळ्यावर लेडी गागाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'मतदारहो, तुम्ही ज्यावेळी मतदानासाठी बाहेर पडाल त्यावेळी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आता तुमचं सगळं आयुष्य त्यांच्या हातात आहे.' लेडी गागाने अशाप्रकारे व्टिट केल्यानंतर तिला तिच्या चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटसला सामोरे जावं लागलं आहे. यामुळे तिचा फेव्हर नेमका कोणत्या उमेदवाराकडे आहे अशीही तिला विचारणा करण्यात आली आहे.

लेडी गागाने यापूर्वीच्या ऑस्करच्या सोहळ्यात केलेलं भाषणाने रसिकांची पसंती मिळवली होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. अमेरिकेतील सद्यस्थितीवर बोट ठेवताना ती कमालीची भावनाविवश झाली होती. यावेळी तिला अश्रु अनावर झाले होते. मंगळवारी अमेरिकेचे नागरिक राष्ट्राचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या जो बायडेन यांच्यासाठी मतदान करुन अमेरिकेचे भविष्य निर्धारित करतील.

एकूण 583 पैकी निर्विवादपणे जिंकण्यासाठी ट्रम्प किंवा बायडेन यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवावी लागतील. त्यामुळे अध्यक्षपदासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 270 मतदारांची मते मिळणे आवश्यक आहे.

2020 च्या या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक पुढे आहेत, असे निवडणुकीपुर्वीचे अनेक अंदाज सांगता आहेत. जर  बायडेन निवडून आले तर ते अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांचे वय आता 78 वर्षे आहे. ट्रम्प हेसुद्धा या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आले तर ते देखील सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्यांचे वय आता 74 वर्षे आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com