esakal | 'लागीरं झालं जी' मालिकेतील 'शीतली'ला कोरोना

बोलून बातमी शोधा

shivani baokar
'लागीरं झालं जी' मालिकेतील 'शीतली'ला कोरोना
sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'लागीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेत शीतलीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकरला कोरोनाची लागण झाली. शिवानीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. 'सर्व प्रकारची काळजी आणि खबरदारी घेऊनही दुर्दैवाने माझी कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली', असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. शिवानीने तिच्या चाहत्यांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये हिंदीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतीलही कलाकार आहे.

शिवानीची पोस्ट

'सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत मी माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करत आहे. मी सर्वांना विनंती करते की कृपया अतिरिक्त खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा. सुरक्षित राहा आणि निरोगी राहा', अशी पोस्ट शिवानीने लिहिली.

हेही वाचा : 'टाईमपास-3'मुळे दिग्दर्शक रवी जाधव वादाच्या भोवऱ्यात

शिवानीच्या या पोस्टवर अभिनेत्री रसिका सुनिल, धनश्री कडगावकर, अपूर्वा नेमळेकर यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला काळजी घेण्याचं आणि लवकरात लवकर बरं होण्याचं आवाहन केलं. शिवानीने शितलीची भूमिका साकारत अनेकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील तिचा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर जादू करत होता. मालिकेनंतर तिचा म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित झाला.